विद्यार्थ्यांनी आज अनुभवली प्रत्यक्षात प्रहारची सहानभुती
चंद्रपूर । किरण घाटे : चंद्रपूर जिल्हातील विसापूर येथील काही विद्यार्थी चंद्रपूर शहरातील स्थानिक छोटूभाई पटेल हायस्कूल येथे शिक्षण घेत आहे .आज शनिवार दि. १०आँक्टाेबरला ते विद्यार्थी शाळेत आले हाेते.त्यांनी अन्नधान्य सुध्दा घेतले हाेते. परंतु विसापुर स्वगावी परतीच्या प्रवासाठी त्यांचे जवळ काेणतेही साधन उपलब्ध नव्हते.याच वेळी चंद्रपूरातील छोटूभाई पटेल हायस्कूल चे भूतपूर्व विद्यार्थी तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे काही सदस्यांनी त्यांना (आज)शनिवारी सहानभुती पुर्वक वाहनाची व्यवस्था करुन सुखरुप रित्या त्यांना आपल्या स्वगावी पाेहचवून दिले ते विद्यार्थी विसापूर मधील गरीब कुटुंबातील असुन सध्या काेराेना परिस्थितीत शाळेमध्ये जाणे त्यांना अशक्य होत आहे. आज याच विद्यार्थ्यांच्या सारासार विचार करता विसापूर मधील असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व छोटूभाई पटेल हायस्कूल चंद्रपूरचे माजी विद्यार्थी यांनी त्यांना प्रामाणिक पणे अन्नधान्य सोडवून देण्यांस आवश्यक ती मदत केली इतकेच नाही तर त्या विद्यार्थ्यांना विसापूर मध्ये देखिल सुखरुप पाेहचवून दिले .या वेळी देवेंद्र उके, रितिक वाकुडकर , सुरज भाऊ ठाकरे ,प्रहार सेवक प्रितम पाटणकर, गोविल खुणे, उमंग जुनघरे , यश उपरे, संदेश उमरे ,प्रशिक चुनारकर, अंशुल रणदिवे ,रोहित साखरे ,अनुदीप शेडमाके ,आदिनी त्यांना सहकार्य देवून मदत केली अर्थातच आज याच गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात ख-या अर्थाने प्रहारची सहानभुती अनुभवली… हे मात्र तेवढेच खरे !
