वेकोलीच्या लोखंडी पुलाची क्षमता तपासून घ्या : राजू रेड्डी

126

वेकोलीच्या लोखंडी पुलाची क्षमता तपासून घ्या : राजू रेड्डी

 

घुग्घूस : काही दिवसांपूर्वी गुजरात येथील मोरबी येथे पूल तुटून अनेक नागरिकांचे जीव गेले तर नुकतेच बल्लारपूर शहरातील रेल्वे पुलाचा काही भाग कोसळून एक महिलेचा मृत्यू झाला तर अनेक नागरीक हे घायाळ झाले आहेत.

याघटनेची घुग्घूस शहरात पुनरावृत्ती होऊ नये याकरिता शहरातील बँक ऑफ इंडिया ते कॉलोनी परिसराला जोडलेला तीस ते चाळीस वर्षे जुना लोखंडी पुलाची क्षमता तपासणी करा जर क्षमता योग्य असल्यास पुलाची तातळीने दुरुस्ती करा असे निवेदन काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी केले आहे.

सध्या परिस्थितीत शहरात राजीव रतन चौकात रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने संपूर्ण वेकोलीवासी व अन्य नागरिकांचे या लोखंडी पुलावरून दुचाकी, सायकल व पायदळी सतत वर्दळ असते.

त्यामुळे या पुलाचे तपासनी दुरुस्ती अत्यंत आवश्यक आहे
या पुला सोबत काही अपघात घडल्यास याला पूर्णपणे वेकोलीचा निष्काळजीपणाच जवाबदार राहणार असून वेकोली अधिकाऱ्यां विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा ही दिला.

advt