गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या सेवा कार्याचा सत्कार

124

गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या सेवा कार्याचा सत्कार

 

घुग्घुस : शहरातील गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी हे आठवड्यातील प्रत्येक सोमवारी शहरातील विविध सामाजिक व सार्वजनिक ठिकाणी मागील तेरा आठवड्या पासून स्वच्छता अभियान राबवित आहे.

आज 14 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता वैराग्यमूर्ती गाडगेबाबा महाराज मंदिर तुकडोजी नगर वॉर्ड क्रंमाक सहा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानात गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मधुकर मालेकर , श्यामराव बोबडे,ज्ञानेश्वर काळे,निळकंठ नांदे,गंगाराम बोबडे,बालाजी धोबे,नंदू ठेंगणे,दिवाकर क्षिरसागर,जनाबाई निमकर
राजुरेड्डी यांनी श्रमदान केले.

कुठल्याही पदाची लालसा न ठेवीत, कुठल्याही सन्मानाची अपेक्षा न ठेवीत ज्येष्ठ नागरिक हे समाजापुढे आपल्या निःस्वार्थ श्रम दानातुन येणाऱ्या युवकां समोर एक आदर्श निर्माण करीत आहे.

त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा देण्यासाठी समाजसेवक राजुरेड्डी यांच्या तर्फे गुरुदेव मंडळ सेवकांचा पुष्पमाला घालून व पुष्प वर्षाव करीत सत्कार केला व त्यांचा आशीर्वाद घेतला.

advt