देवई येथे आदिवासी समाजाची महागोंगो पुजा व गोंडी धर्म प्रबोधन संपन्न

446

देवई येथे आदिवासी समाजाची महागोंगो पुजा व गोंडी धर्म प्रबोधन संपन्न

जंगो रायताळ, कंकाली माता, जयतूर शक्तीपीठाची झाली महापुजा

पोंभूर्णा :-तालूक्यातील आदिवासी गाव असलेल्या देवई येथे महागोंगो पुजा व गोंडी धर्म समाज प्रबोधन कार्यक्रम आदिवासी सगाजणाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी देवईला यात्रेचे स्वरूप आले होते. हजोरोच्या संख्येने आदिवासी सगाजणसमुदाय उसळला होता.यावेळी जय सेवाच्या जयघोषात देवई गाव दुमदुमूत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते विलास मोगरकार,अध्यक्षस्थानी गोंडियन धर्म प्रचारक जगन येलके,प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुर्ती शिल्प अभ्यासक सुरज गोरंतवार यांची उपस्थिती होती.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच नवनाथ आत्राम,ड्रेफूल आत्राम,बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष अशोक उईके,बिरसा क्रांती दलाच्या महिला जिल्हाध्यक्षा मंदाताई मडावी,संगठक राजेंद्र धुर्वे,विजय वासेकर, महेंद्र शेडमाके,संपत मेश्राम, दर्शन शेडमाके, प्रा. नामदेव कन्नाके,निर्मला मेश्राम, गणेश वासलवार,वर्षा आत्राम, ललीता कोवे,दौलत आत्राम,डॉ.सातपुते,कुंदा उईके यांची प्रमुख उपस्थिती होती.

देवई पुरातन गाव आहे.येथे हजारो वर्षांपासून आदिवासी संस्कृती जोपासली जात आहे.महागोंगो पुजाचे औचित्य साधून पेरसापेन पुजा,बडा देव पुजा,कली कंकाली व जंगोरायताळ व जयतुर शक्तीपीठ पुजा,गढी पुजा व मयसम्मा पुजा करण्यात आली.यावेळी ग्रामफेरी काढण्यात आले.प्रत्येक घरासमोर सडा सारवण व रांगोळी टाकण्यात आली होती.गावात तिर्थयात्रेचे स्वरूप आले होते.
भिमदास आलाम,देवानंद कुळमेथे यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करण्यात आले.व महागोंगो पुजा करून गोंडी धर्म व देवईचा इतिहास यावर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जंगोरायताळ कंकाली माता देवईगढी समिती व देवई वासियांनी अथक परिश्रम घेतले.यावेळी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाचेही फार मोठे सहकार्य लाभले.

advt