मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर च्या वतीने पालडोह येथील विद्यार्थाना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वितरण

0
390

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर च्या वतीने पालडोह येथील विद्यार्थाना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वितरण

 

 

आवाळपूर :- प्रत्येक विद्यार्थाना त्यांच्या जीवनात असलेले शिक्षणाचे महत्त्व व जीवन कौशल्य शिक्षणाचे महत्व समजणे गरजेचे असून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यास ते आपल्या गरीब परिस्थितीवर मात करून जीवनात यशस्वी होतील असा विद्यार्थी घडविण्याचे ध्येय समोर ठेऊन प्रशांत लोखंडे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यात संस्थेचे कार्य सुरू असून जिल्ह्यातून नावीन्य पूर्ण उपक्रमा करीता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोह ची निवड करून येथिल 6 ,7 या वर्गात शिक्षण घेणाऱ्या 53 विद्यार्थाना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संगीता हाके तर उदघाटक, साहित्य वितरक म्हणून प्रशांत लोखंडे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर,हे होते , प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी, गाव पाटील गोपीनाथ देवकते , मॅजिक बस संस्थेचे योगेश मोरे, हिराचंद रोहनकार, नितेश मालेकर, निखिलेश चौधरी , आकाश गेडाम ,मुकेश भोयर, सुरेंद्र खंडेराव, शाळेचे शिक्षणप्रेमी देवकते , मेघा रुंजे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची रूपरेषा व जीवनात शिक्षणाचे महत्त्व व त्यामुळे होणारी शैक्षणिक गुणवत्ता विकास या करिता आवश्यक गरजा या वर आधारीत मार्गदर्शन प्रशांत लोखंडे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर यांनी केले.

जिवती तालुका सारख्या दुर्गम भागात 365 दिवस शिक्षण हा उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्तेकडे वाटचाल करणारी शाळा म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोह ची ओळख असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी यांनी आपल्या मार्गदर्शनात दिली.

या कार्यक्रमाचे संचालन शाळेचे विद्यार्थी विशाखा देवकते, दिव्यका बाजगिर यांनी केले तर आभार दिव्यांनी केंद्रे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीत ते करिता शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक ,विद्यार्थी , मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चे कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here