आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भुमिपूजन

0
356

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भुमिपूजन

 

 

चंद्रपूर शहर व ग्रामिण भागाच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. दरम्याण खनिज विकास निधी अंतर्गत मंजुर वडगांव आणि पडोली येथील विकास कामांचे त्यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, यंग चांदा ब्रिगेड तालुकाध्यक्ष राकेश पिंपळकर, अल्पसंख्याक विभागाचे शहर युथ प्रमुख राशेद हुसेन, माजी नगर सेविका सुनिता लोढीया, पडोली सरपंच विक्की लाडसे, उपसरपंच्या सविता नागरकर, सदस्य छाया पायघन, पडोली विभाग अध्यक्ष भाग्यवान गणफुले, माजी सरपंच प्रविन सिंग, माजी सरपंच्या संगिता आवळे, किशोर आवळे, दयानंद नागरकर, गणेश पाचभाई, सुरज मेघवानी, विक्की रेगंटीवार यांच्या सह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.

चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यासाठी मोठा निधी त्यांनी उपलब्ध करुन दिला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ग्रामिण भागाला शहराशी जोडणाऱ्या प्रमुख मार्गासाठी 60 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. यातुन लवकरच या मार्गांच्या कामाला सुरवात होणार आहे.

दरम्याण पडोली आणि वडगांव येथील रस्ते बनविण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती. याची दखल घेत सदर रस्त्यांसाठी खनिज विकास निधीतुन 70 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते नुकतेच या कामाचे भुमिपूजन करण्यात आले. चंद्रपूर शहरातील रखडलेली विकास कामे पुर्ण करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहे. आपण शहराच्या शेवटच्या भागापासुन विकास कामांना सुरवात केली आहे. आज येथील नागरिकांची मागणी पुर्ण करता आली याचे समाधान असले तरी यावर आम्ही थांबणार नाही. या भागातील उर्वरित विकास कामेही पुर्ण करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न राहणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या प्रसंगी मंगला भागवत, सुमन घागरगुंडे, मंगला रामटेके, गिता आवळे, मंदा आवळे, अनिता नागरकर, रोषनी आवळे, रजनी घागरगुंडे, अर्पणा आवळे, शितल कासवते, कश्तीजा कोल्हे, निलेश पाऊनकर, महेश धोटे, रोहित धाबाडे, किरण रामेडवार, शुभम बलकी, सचिन खारकर, अनंता पिंपळशेंडे यांच्यासह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here