अमराई वार्ड प्रभाग क्रमांक ०९, १० व ११ मधील नाल्या दुरुस्ती करून भूमिगत करा…. – आम आदमी पार्टीची मागणी

0
461

अमराई वार्ड प्रभाग क्रमांक ०९, १० व ११ मधील नाल्या दुरुस्ती करून भूमिगत करा…. – आम आदमी पार्टीची मागणी

 

पंकज रामटेके /विशेष प्रतिनिधी

घूग्घुस गावातील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे अमराई वार्ड येथील प्रभाग क्रमांक ०९, १० व ११ येथील नाल्या ग्रामपंचायत काळा मध्ये बनलेल्या होत्या ज्या आता पूर्णपणे उध्वस्त झालेल्या आहे. ज्यामुळे पावसाळ्यामध्ये नालीतील संपूर्ण घान रस्त्यावर येऊन रोगराई पसरत आहे नागरिकांना डेंग्यू व मलेरिया सारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. घूग्घुस नगरपरिषद बनून जवळपास दोन वर्ष झालेले आहे परंतु येथील नगरपरिषद व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.
याची दखल घेत आम आदमी पार्टी घूग्घुस शहर अध्यक्ष अमित बोरकर यांच्या नेतृत्वात दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी नगरपरिषद कार्यालय घूग्घुस इथे निवेदन देण्यात आले व प्रभाग क्रमांक ०९,१० व ११ मधील संपूर्ण नाल्यांची दुरुस्ती करून भूमिगत करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा अमित बोरकर यांनी दिला.

यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here