विरुर पोलीस ठाण्यात आझादी चा अमृत महोत्सव साजरा

0
602

विरुर पोलीस ठाण्यात आझादी चा अमृत महोत्सव साजरा

विरुर स्टेशन – अविनाश रामटेके


विरुर पोलीस स्टेशन , शांतता कमेटी विरुर व महिला दक्षता समिती विरुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस ठाण्याच्या प्रांगणात स्वतंत्र च्या 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला , यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थी करिता निबंध स्पर्धा व प्रौढांसाठी पंच्याहत्तरशे मीटर पैदल दौड मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली , निबंध स्पर्धेत दोनशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला तर
विरुर परिसरातील पन्नास वर्षे वरील वयोगटातील पुरूषांनी हिरहीरेने भाग घेऊन स्वतंत्र च्या महोत्सवात अधिकच भर टाकला.

हर घर झेंडा या उपक्रमा अंतर्गत विरुर येथिल विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनि सहभाग घेऊन गावात रॅली काढण्यात आली अली दरम्यान शिवाजी कॉलेज राजुरा या शाळेतील चमुनीं पाथनाट्य च्या माध्यमातून घर घर तिरंगा झेंडा शासनाच्या या उपक्रमा बद्दल विरुर येथील गांधी चौकात जनजागृती केली व उपस्थित नागरिकांना राष्ट्रध्वज याचा मान सन्मान कसा बाळगावा यांविषयी आपल्या प्रबोधन मार्फत संदेश देण्यात आला.

आज आयोजित स्वातंत्र्य च्या अमृत महोत्सव चे औचित्य साधून घेतलेल्या स्पर्धा ला जे स्पर्धक विजेतेपद भूषविले त्यांना मानचिन्ह व प्रोत्साहन पद देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला ठाणेदार राहुल चव्हाण ,भाग्यश्री आत्राम सरपंच विरुर , श्रीनिवास इलांदूला उपसरपंच विरुर , राजू इंग्रपवार अध्यक्ष तंटामुक्त विरुर, सतीश कोमरवेळीवर अध्यक्ष व्यापारी असोसिएशन विरुर , विलास अक्केवार ,भीमराव पाला , रामू सोनी ,सुरेश पावडे ,रवींद्र कुळमुथे , मोतीराम दोबल्ला , अर्चना कस्तुरवार ,माया मेश्राम ग्राम पंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच विरुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले 24 गावचे पोलीस पाटील हजर होते ,प्रथमच या वर्षी पासून आदर्श पोलीस पाटील म्हणून पोलीस पाटलाचे मनोबल वाढविण्यासाठी पारितोषिक सुरू करण्यात आले ,यावेळी चिंचोली येथील नेवारे पोलीस पाटील यांना पुरात अडकलेल्या 35 नागरिकांना वाचविण्यासाठी सुरेख कामासाठी याना हा मान देऊन त्यांना गौरविण्यात आले.

त्याचप्रमाणे अतिशय मागासलेला आदिवासी भाग असलेल्या बगलवाही येते महिला प्रौढ शिक्षण करिता ठाणेदार राहुल चव्हाण आपल्या संकल्पेतून त्याच भागातील सजसेविक शीला जाधव यांच्या मदतीने रात्रोची शाळेचे उदघाटन करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करिता दिवाकर पवार मेजर ,वाघधारकर मेजर ,कुलसंगे मेजर ,विजू मुंडे ,भगवान मुंडे ,सहारे ,काळे ,मिलिंद बावणे ,संतोष उपरे यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here