घुग्घुस ते चंद्रपूर कोल डेपो बंद करण्यात यावे…

0
434

घुग्घुस ते चंद्रपूर कोल डेपो बंद करण्यात यावे…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा महासचिव सुरेश पाईकराव यांची मागणी

 

चंद्रपूर, 4 ऑगस्ट : जिल्हाधिकारी, राष्ट्रीय हरित अधिकरण, पुणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे सुरेश पाईकराव जिल्हा महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी घुग्घुस ते चंद्रपूर येथील कोल डेपो तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

या कोल डेपो च्या प्रदुषणामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या खुप मोठ्या प्रमाणात शेती चे नुकसान होत आहे. काही कोल डेपोला जवळ लागुन दवाखाने शाळा आहेत. तर या लहान लहान मुलांचे आरोग्य सुध्दा या कोल डेपोच्या प्रदुषणामुळे धोक्यात आले आहे. सदर गंभीर विषय लक्षात घेता वेकोलीचा कोळसा हे कोल माफीया कोळसा चोरुन या कोल डेपो मध्ये कमी किमतीत घेऊन कोळसा तस्करी सुरु आहे. या कोल डेपो मुळे गोर गरिब लोकांना याचा मार सहन करावा लागत आहे. काही भाग जर कोळसा चोरी गेला तर कोळसाचे कमतरतेमुळे वीजेचे भार वाढते, विजेचे जर भार वाढले तर ते विज बिल वाढवितात, असा प्रकारे गोर गरिब लोकांनाही या कोल डेपो मुळे मार सहन करावा लागत आहे.

यामुळे सर्व कोल डेपोला तात्काळ बंद करून कोळसाची तस्करी थांबवुन लोकांना न्याय मिळवून देण्यात यावा. अशी असे मागणी केली आहे. निवेदन सादर करताना अशोक आसमपल्लिवार, अशोक भगत, जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, राकेश पारशिवे, आदित्य सिंह, आशिष परेकर, डोरलीकर, विलास पचारे, कुणाल कामतवार, सिध्दांत गुडदे, अंकित नालमवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here