शासकीय विश्रामगृहात पार पडली वंचित बहुजन आघाडीची बैठक
राजुरा, 24 जुलै : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडी शाखा राजुरा शहर कार्यकरणीची महत्वपूर्ण बैठक शहराध्यक्ष अमोल राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत आगामी निवडणुका वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदीनिशी स्वबळावर लढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नगर परिषद राजुरा च्या सर्व जागा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढविणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शहरातील कार्यकरणीची सदस्य संख्या वाढविणे, इच्छुक उमेदवारांची चाचपणी तसेच संपर्क वाढविणे व वॉर्ड शाखा स्थापन करण्यावर भर देण्यात येणार असल्याची चर्चा झाली. साई नगर येथील जगन्नाथ बाबा मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या बैठकीला शहराध्यक्ष अमोल राऊत, जिल्हा कोषाध्यक्ष किशोर रायपूरे, तालुका उपाध्यक्ष विजय जुलमे, तालुका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, तालुका सचिव राजू जुलमे, तालुका कार्याध्यक्ष सुभाष हजारे, तालुका सल्लागार सच्चिदानंद रामटेके, ज्येष्ठ कार्यकर्ता प्रभुदास वनकर, ज्येष्ठ कार्यकर्ता वासुदेव मावलिकर आदी सुकानु समितीचे सदस्य उपस्थित होते.