एसटी कामगारांना वंचित बहुजन आघाडीची सदिच्छा भेट व आंदोलनास जाहीर पाठिंबा

0
825

एसटी कामगारांना वंचित बहुजन आघाडीची सदिच्छा भेट व आंदोलनास जाहीर पाठिंबा

येत्या तीन दिवसात एसटी कामगार समर्थीत जनजागृती रॅलीचे आयोजन

राजुरा : एस टी कामगारांच्या आंदोलनाला दोन आठवडे पूर्ण होत आली असून राज्य शासनाकडून एस टी कामगारांना दिलासा दायक निर्णय अजून घेतला नाही. यामुळे एस टी कामगार संपावर कायम आहेत. आज आंदोलनाच्या पंधराव्या दिवशी वंचित बहुजन आघाडी शाखा राजुराने सदिच्छा भेट देत येत्या तीन दिवसात एसटी कामगार समर्थीत जनजागृती रॅली काढत कामगारांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीला घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत संप व आंदोलन सुरू आहे. आज वंचित बहुजन आघाडी तालुका राजुरा च्या वतीने एसटी आगार राजुरा येथे सदिच्छा भेट देऊन आंदोलनास जाहीर पाठिंबा देऊन शुभेच्छा व पाठबळ दिले.

एसटी कामगारांच्या बेमुदत संपामुळे सामान्य जनतेच्या प्रवासात अडचण निर्माण झाली असून शाळकरी मुले, वयोवृद्ध, सामान्य जनतेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. सामान्य कुटुंबातून एसटी महामंडळात नोकरीला असलेल्या कामगारांना तोकड्या मानधनात सेवा द्यावी लागत आहे. यामुळे राज्यातील एसटी कामगारांना दिलासा मिळण्यासाठी विलनिकरण करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन अजूनच चिघळत चालले आहे. मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या राज्य शासनाची कुंभाकर्णी झोप उघडेल कधी…?

राजुरा आगारातील पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सामान्य जनतेच्या प्रवासाची हक्काची लालपरी रस्त्याने कधी धावेल याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा आय टी सेल प्रमुख अमोल राऊत, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र कुलमेथे, तालुका निरीक्षक भगीरथ वाकडे, तालुका अध्यक्ष सुशील मडावी, उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, महासचिव सदानंद मडावी, प्रणित झाडे, वासुदेव मावलीकर, रविकिरण बावणे, वाघू वनकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here