जि.प.सदस्य राहुल संतोषवार यांच्या पुढाकाराने पाण्याच्या कॅन चे वितरण..!

0
631

 जि.प.सदस्य मा.राहुलभाऊ संतोषवार यांच्या पुढाकाराने पाण्याच्या कॅन चे वितरण..!

घनोटी तुकुम, घनोटी नं.१,घनोटी नं.२ येथे पाण्याचा कॅन चे वितरण..

जिल्हा निधी पंचायतराज योजना अंतर्गत ग्रामपंचायत च्या माध्यमातून वाटप

रुपेश मंकिवार

तालुका प्रतिनिधी पोंभुर्णा :-माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा विद्यमान विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या सेवेत तत्परतेने कार्य करणारे केमारा-देवाडा खुर्द जि.प. क्षेत्राचे सदस्य .राहुल संतोषवार यांच्या पुढाकाराने जिल्हा निधी पंचायतराज योजना अंतर्गत ग्रामपंचायतच्या माध्यमातून गट ग्रामपंचायत असलेल्या घनोटी तुकुम, घनोटी नं.१,घनोटी नं.२ येथील जनतेला पिण्याच्या पाण्याचे कॅनचे वितरण करण्यात आले.तसेच जिल्हा परिषद शाळा,अंगणवाडी,महिला बचत गट,ग्रामसंघ,भजन मंडळ यांना .राहुल संतोषवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.या उपक्रमामुळे सर्वसामान्य जनतेला आरोग्यासाठी पाणी पिण्यासाठी थंड व सोईस्कर झालेले आहे.यावेळी ग्रामपंचायत घनोटी तूकुम च्या वतीने सरपंच यशोदा ठाकरे यांनी जि.प. सदस्य .राहुल संतोषवार यांचा शाल,श्रीफळ,भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.ग्रामपंचायतनी यावेळी सत्कार केल्याबद्दल राहुल संतोष वार यांनी सर्वांचे आभार मानले व नेहमीच गावाच्या विकासासाठी कार्यरत राहनार असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी उपस्थित सरपंच यशोदा संदिप ठाकरे,उपसरपंच वैशाली बुरांडे,ग्रा. सदस्य यशवंत ढोंगे,अर्चना उईके,नानाजी टेकाम,रामकृष्ण गव्हारे, शामसुंदर नैताम, पुरुषोत्तम गव्हारे, किशोर दुधबळे, लक्ष्मण गव्हारे,कालिदास उईके, मनोज सोयाम, प्रविण कोडापे, संदीप ठाकरे, संदीप पेंदोर,कीर्ती सातपुते, सपना घोडाम,अनिल गेडाम, नरेश कोडापे, पांडुरंग कोडापे, आबाजी टेकाम,मसराम कोडापे,जयंत पिंपळशेंडे,चंद्रशेखर झगडकर, यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here