कर थकबाकीमुळे अंचलेश्वर वॉर्डातील दुकान गाळे सील

0
416

कर थकबाकीमुळे अंचलेश्वर वॉर्डातील दुकान गाळे सील

मनपा कर वसुली व जप्ती पथकाची कारवाई

 

चंद्रपूर, ता. १७ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली व जप्ती पथकाने दि. १७ फेब्रुवारी २०२२ ला अंचलेश्वर वॉर्ड येथील मालमत्ता धारकाच्या निवासासह दुकान यावर सन २०१५-१६ ते २०२१-२२ पर्यंतचा मालमत्ता कर थकीत असल्यामुळे जप्ती कार्यवाही केली व दुकानास सील लावण्यात आले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली व जप्ती पथकाने दि. १७ फेब्रुवारी २०२२ ला अंचलेश्वर वॉर्ड येथील मालमत्ता क्र. 2U-193 या मालमत्ता धारकाच्या निवासासह दुकान यावर सन २०१५-१६ ते २०२१-२२ पर्यंतचा मालमत्ता कर थकीत असल्यामुळे जप्ती कार्यवाही केली व दुकानास सील लावण्यात आले. अंचलेश्वर-२ येथील मालमत्ता क्र. २t-५ आणि भिवापूर येथील मालमत्ता क्र. २N-३१५ या निवासी मालमत्ता धारकांनी जप्ती पथकास सकारात्मक प्रतिसाद देऊन कर भरणा करुन जप्ती कार्यवाही टाळली.

ही कारवाई कारवाई मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली झोन 2 चे प्रभारी सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे, वार्ड लिपिक पारेलवार, शिपाई भावरकर व सुरक्षा रक्षक यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here