ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

0
349

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

अमोल राऊत

कृषीप्रधान देशात ग्रामीण भागातील समस्यांकडे सरकार व प्रशासनाच्या वतीने लक्ष दिल्या जात नाही. ग्रामीण भागातील जनतेला निवडणुका व निवडणुकीतील आश्वासने यापेक्षा जास्त काहीच सरकारच्या वतीने मिळत नाही.
वरोरा तालुक्यातील उखर्डा पाठी ते उखर्डा तसेच उखर्डा ते नागरी या संपुर्ण रस्त्याची दुरवस्था झाली आहे.संपुर्ण रस्त्यावर जीवघेणे मोठ मोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे त्या भागातील खाजगी व सार्वजनीक प्रवासी वाहतूक पूर्णत विस्खडीत आहे. एखादा अपघात झाल्यास आपातकालीन परिस्थीतीत एखादी रुग्णवाहिका देखील येऊ शकत नाही पण याकडे ना लोकप्रतिनिधि ना सार्वजनीक बांधकाम विभाग प्रशासनाचे लक्ष आहे.
या भागातील नागरीकांनी अनेकदा त्या भागातील लोकप्रतिनिधि व प्रशासनाकडे तक्रारी केल्या पण रस्त्याची समस्या काही सुटेना!
माननीय आमदार प्रतिभा ताई धानोरकर यांना निवेदन देऊन देखील खड्डे बुजविण्यात आले नाही. यामुळे स्थानिकांकडून खड्ड्यात बेसरमची झाडे लावून आंदोलन करण्यात आले. जर 10 दिवसात खड्डे बुजविण्यात आले नाही तर वरोरा येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. या जीवघेण्या खड्डया मुळे गावातील एका तरुणाचा अपघात झाला आहे व गंभीर जखमी झाले आहेत, तर या खड्ड्यात पडून कुणाला जीवित हानी झाली तर प्रशासन जबाबदार राहणार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here