रामपूर गोवरी मार्गावर वेकोलीमुळे निर्माण झालेल्या समस्या घेऊन शिवसेनेचा रास्तारोको

0
513

रामपूर गोवरी मार्गावर वेकोलीमुळे निर्माण झालेल्या समस्या घेऊन शिवसेनेचा रास्तारोको

प्रमुख मागण्या सात दिवसात मार्गी लागणार, वेकोली अधिकाऱ्यानी आंदोलनास भेट देऊन दिले आश्वासन

सात दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास वेकोली कार्याल्यासमोर करणार बेमुदत आंदोलन – बबन उरकुडे

 

रामपूर-गोवरी-पोवणी रस्त्यावरील जड वाहतूक आणि प्रदुषणासंदर्भात शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या उपस्थितीत राजुरा शिवसेनेच्या वतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले. वेकोलीमुळे निर्माण झालेल्या प्रमुख मागण्यांना घेऊन लेखी निवेदन देण्यात आले. वेकोली अधिकाऱ्याकडून आंदोलनस्थळी भेट देऊन येणाऱ्या सात दिवसात प्रमुख मागण्यांची पूर्तता करण्यात येईल अशे आश्वासन देण्यात आले.

यामध्ये 1) चड्डा ट्रान्सपोर्ट, जैन ट्रान्सपोर्ट, नुराणी ट्रान्सपोर्ट यांच्या मुजोरीने 22 ते 25 टन क्षमता असलेल्या रामपूर गोवरी पोवणी मार्गावर 60 ते 65 टनची जडवाहतूक होत असून ते त्वरित थांबवण्यात यावी.
2) रामपूर गोवरी पोवणी मार्गांवरून होणाऱ्या वाहतुकीमुळे प्रदूषण वाढले असून त्याचा थेट परिणाम रस्त्याच्या आजूबाजूच्या शेतीवर होत आहे परिनामत: पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यासाठी रोज 3 ते 4 वेळा रस्त्यावर टँकरनी पाणी चालवण्यात यावे.
3) या मार्गाच्या झालेल्या दुर्दैषेला सर्वस्वी वेकोली जबाबदार असून सदर रस्त्याचे दुरुस्तीकरन करण्यात यावे.
4) भडांगपूर येथून स्थलांतरित रामपूर येथील कुटुंबाना त्यांच्या जमिनीची पट्टे त्वरित देण्यात यावे.
5) गोवरी पोवणी एक्सपान्शन सेकशन-7 लावणाच्या लेखी आश्वासनानुसार ते जानेवारीत मार्गी लागणार होते. त्यासंदर्भात त्वरित कार्यवाही करण्यात यावी.
6) बल्लारपूर एरियात 5 मिट्टी कंपनीचे काम चालू असून स्थानिकांना रोजगारापासून वंचित ठेवल्या जात आहे. स्थानिकांना रोजगारात समाविष्ट करून घेण्यात यावे यासंह अनेक विषयावर चर्चा करून त्याची पूर्तता सात दिवसाच्या कालावधीत करू असे आश्वासन देण्यात आले.

स्थानिक बेरोजगारांच्या मुख्य प्रश्नावर वेकोलीने आश्वासक भूमिका मांडली असून वेकोली शिष्टमंडळातील अधिकारी श्री पुल्लया साहेब श्री बराला साहेब यांनी कॅटेगरी नुसार स्थानिक युवकांना मिट्टी कंपनीत रोजगार देण्यात येणार असल्याचे सांगितले. या बेमुदत आंदोलनाला वेकोलीच्या आश्वासाना नुसार तूर्तास स्थगिती दिली असून मागण्या पूर्ण न झाल्यास वेकोली कार्याल्यासमोर आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.

स्थानिक बेरोजगार तरुणांनी आपला बायोडाटा शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या शिवसेना कार्यालयात जमा करून नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी राजुरा शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव चापले, शिवसेना तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर, शिवसेना शहर प्रमुख निलेश गंपावार, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, शिवसेना शहर समन्वयक बबलू चव्हाण, माजी सरपंच रामपूर उज्वल शेंडे, विभाग प्रमुख अजय साकीनाला, रमेश कुडे माजी उपसरपंच रामपूर, तिरुपती काटम, अनिल लिपटे, श्याम मुत्तुंनरी, अतुल खनके, जुटी सुरेश, प्रभाकर गुडेट्टी, प्रफुल मादास्वार, गणेश चोथले, अक्षय लांडे, श्रावण गोरे, किरण पारखी, सुनील पाचभाई,मयूर गोहने, आशिष मालेकर, अनिकेत गिरसावडे, रुपेश गोहने, आशाताई उरकुडे सरपंच गोवरी, संगीता विधाते ग्रा प सदस्य रामपूर, लता डाखरे ग्रा प सदस्य रामपूर, नळे ताई, मायाताई मालेकर, वर्षा पंदीलवार, वनिता येनूरकर, कावळे काकू, साधना गोरे, सुशीला काळे, पोटे काकू, आमने काकू, भोयर काकू, निरजा मारपे, प्रतिभा टेकाम, नंदा सिडाम, मालन टेकाम, सुवर्णा बोबडे, रेखा नुलगामकर, पौर्णिमा मरोने, कमलाबाई मडावी, तुळशीराम मरापे, कल्पना आत्राम, सोनू मत्ते, रेखा मडावी, शेवंता मरापे, सुनीता सोयाम, संगीता कुळसंगे, कुसुम सिडाम, ताराबाई कोडापे यासंह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here