पोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत कायम

0
770

पोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत कायम

चेक बल्लारपूरात वाघाने शेळी केली फस्त,गुराखी बचावला

रुपेश मंकिवार

पोंभुर्णा :- पोंभूर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूरातील शेतशिवारात चरत असलेल्या शेळ्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना शुक्रवारला दुपारी ३ वाजता च्या दरम्यान घडली.यात वाघाने एक बकरी फस्त केले असून प्रसंगावधान राखल्याने गुराख्याने आपले प्राण बचावले.

पोंभुर्णा तालुक्यात मागील दहा दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातला आहे.यात बैल, शेळ्यांना ठार केले आहे तर कसरगट्टा येथील बेबीताई हनुमान धोडरे या महिलेचा बळी घेतला, काल एका दुचाकीस्वार युवकाला रस्त्यावरून फरफडत जंगलात नेले,यात तो गंभीर जखमी झाला. या घटना ताज्या असतानाच आज पोंभुर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूर येथील शेतशीवारात दबा धरून बसलेल्या वाघाने बकऱ्याच्या कळपावर हल्ला चढवला या हल्ल्यात वाघाने एक बकरी फस्त केली. अचानक झालेल्या हल्याने गुराखी घाबरला व गावाकडच्या दिशेने धाव घेतली.आरडाओरड होताच तिथे गावातील नागरिक पोहचले व वाघाला पळवून लावले.

पोंभूर्णा तालुक्यात दिवसेंदिवस वाघाच्या घटना घडत असताना याकडे वनविभागाने पुरता लक्ष देण्याची गरज आहे. पोंभुर्णा परीसरात सध्या कापुस वेचणीचे काम सुरू आहे.वाघाच्या भितीने मजुर कापूस वेचणीचे काम करण्यासाठी घाबरत आहेत.यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.यासाठी या वाघांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील नागरीकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here