खीरडी येथे लोक सहभागातून शेतकऱ्यासाठी बांधला वनराई बंधारा

0
413

खीरडी येथे लोक सहभागातून शेतकऱ्यासाठी बांधला वनराई बंधारा

 

कोरपना : गडचांदूर पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खीरडी येथे लोक सहभागातून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी वनराई बंधारा बांधण्यात आला. सदर वनराई बंधारा रब्बी पिकांचे नियोजन करून पीक घेण्याकरिता वरदान ठरेल असे मत यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.

गडचांदूरचे तलाठी अन्सारी, ग्रा. पंचायत खीरडी ग्रामसेविका उईके मॅडम, संगणक परिचालक दीपक ढवस, ग्राप शिपाई अजय पिंपलकर, जिप प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक किंनाके व विद्यार्थी तसेच अंगणवाडी सेविका वैशाली तोडासे, अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे सहकारी अरविंद बावणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धनराज मालेकर, सदस्य सुनील तुराणकर आणि समस्त गावातील नागरिक उपस्थित होते. लोकसहभागातून वनराई बंधारा बांधून पूर्ण केला. त्यामुळे येणाऱ्या काळात पिक घेण्याकरिता तो बंधारा वरदान ठरणार आहे. यामुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here