शेतातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्यांच्या कामाला तलाठी विनोद खाेब्रागडेंनी केली सुरुवात

0
519

शेतातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्यांच्या कामाला तलाठी विनोद खाेब्रागडेंनी केली सुरुवात

राजूरा (चंद्रपूर), किरण घाटे – जिल्ह्यातील राजूरा तालुक्यात दि. २१,२२ व २३जूलैला मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे प्रचंड प्रमाणात शेतक-यांचे नुकसान झाले. दरम्यान धिडसी साजाचे तलाठी विनोद खाेब्रागडे यांनी प्रत्यक्ष शेतात जावून पंचासमक्ष नुकसानीचे पंचनामे करण्यांस दाेन दिवसांपासून सुरुवात केली आहे.

 

तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात पीकांचे नुकसान झाल्यामुळे स्थानिक उपविभागीय अधिकारी व राजुरा तहसिलदार यांच्या एका आदेशाच्या अनुषंगाने काल On The Spot मौजा धिडसी गावातील शेतात पंचासमक्ष मौके पंचनामे तलाठी विनाेद खाेब्रागडे यांनी केले आहे. संबंधित नुकसान ग्रस्त शेतक-यांनी बँक अकाउंट नंबर, IFSC नंबर व मोबाईल नंबर तात्काळ तलाठी, ग्रामसेवक व क्रूषि सहायक यांना देण्यांची सुचना तलाठी खाेब्रागडे यांनी केली आहे. आपल्या साजा अंतर्गत येणां-या नुकसान ग्रस्त शेतक-यांच्या माहितीसाठी त्यांनी एक संदेश देखिल व्हाँटसअपच्या माध्यमांतुन नुकताच प्रसारित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here