समाज कल्याण कार्यालयाला सम्यक विद्यार्थी आंदोलन शिष्ट मंडळाने दिली धडक

0
523

समाज कल्याण कार्यालयाला सम्यक विद्यार्थी आंदोलन शिष्ट मंडळाने दिली धडक

महाराष्ट्र शासनातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘स्वाधार योजना’ अंतर्गत विद्यार्थांना लवकरात लवकर लाभ देण्यात यावा अन्यथा सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे धिरज तेलंग यांचा आंदोलनाचा इशारा…

चंद्रपूर २०/०८/२०२०

समाज कल्याण कार्यालयाला निवेनाद्वारे सांगण्यात आले कि महाराष्ट्र शासनातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावे ‘स्वाधार योजना’ राबविण्यात येते, सदर योजना लाभार्थी हा ह्या योजनेतुन स्वताहाचे शिक्षण, खाद्य, रहवाशी भाडे याचे नियोजन करुन शिक्षण घेत असतो. राज्य शासनातर्फे अनूसुचित जाती/जमाती च्या विद्यार्थी वर्गाला योग्य शिक्षण मिळाव ह्या उद्देशाने शासन नेहमींच प्रर्यत्नशिल असल्याचे प्रचार/प्रसार माध्यमातुन सांगत असतो, मागील भाजप सरकार च्या काळात ह्यांच अनूसुचित जाती/जमाती च्या विद्यार्थी वर्गाच्या शिष्यवृत्तीवर डल्ला मारण्यात आला. कोटीच्या घरात भ्रष्ट्राचार करण्यात आला त्याची नागपूर पोलिसांच्या समितिद्वारे चौकशी सुध्दा केल्या गेली होती. मात्र शासन उदार असल कि त्यांची ही फज्जा होते यांत शंका नाही, ह्या संपुर्ण भ्रष्ट्राचाराच्या विरोधात राज्य भर सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आपली विरोधी भुमिका बजावली आहे आणी सातंत्याने बजावित राहीलचं.!

राज्यभराच्या ‘स्वाधार योजना’ च्या लाभार्थी विद्यार्थी वर्गाला २०१९-२० ह्या वर्षाचा लाभ अद्याप प्राप्त झालेल्या नाही, राज्य भराच्या जिल्ह्याप्रमाणेचं चंद्रपूर जिल्ह्यात १) कला – वाणिज्य – विज्ञान, खत्री कॉलेज, ताडोबा रोड, चंद्रपूर २) शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर ३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, चंद्रपूर येथिल आमच्या माहितीसप्राप्त १२ विद्यार्थी ची चालु सत्राचे ‘स्वाधार योजनाअंतर्गत रक्कम’ प्राप्तचं झालेली नाही ज्याचा प्रथम टप्पा १८,००० व द्वितीय टप्यातील २३,००० हजाराची रक्कम माहे फरवरी / मार्च पर्यन्त प्राप्त होणे शक्य होते.

सोबत जिल्ह्यातील जनता कॉलेज व डॉ.आंबेडकर कॉलेज येथील किमान ६ विद्यार्थी यांच्या माहिती प्रमाणे त्यांना प्रथम टप्यातील रक्कम बहाल करुन देत द्वितीय टप्यातील रक्कम अद्याप थकित ठेवून राज्य शासनाने समाज कल्याण विभाग उपलब्धचं करुन न दिल्याचे सांगून त्यांना वाट पहाण्याचा संदेश दिल्याचे आम्हास लेखी स्वरुपात माहिती दिला. महोदय, सम्यक विद्यार्थी आपणास विनंती करतो, कि सदर योजनेतून लाभ प्राप्त विद्यार्थी हा तालुका/गाव या ठिकाणातुन उच्च शिक्षण घेण्यास शहरी भागात दाखल होतो, शासन ह्या अनूसुचित जाती/जमाती च्या विद्यार्थी वर्गाच्या शिक्षणाची जबाबदारी घेत त्यांना कुठेही वंचित न होऊ देण्याचे सातंत्याने आश्वासन देत असतो. ज्या संदर्भात‚ आपले सरकार ह्या सांकेतीक स्थळावर सुध्दा तक्रार केल्याची माहिती विद्यार्थी वर्गाकडून आम्हास प्राप्त झाली आहे, तेव्हा राज्य शासनाच्या महाविकास आघाडीच्या सरकार ला आम्ही आपल्या मार्फत विनंती करतो कि ‘स्वाधार योजना’ प्राप्त लाभार्थी विद्यार्थी वर्गाची थकित असलेली रक्कम लवकरात लवकर बहाल करुन त्यांची गैरसोय दुर करावी जेणे करुन त्यांना शिक्षणापासून वंचित होणे टाळता येईल.!

अन्यथा सम्यक विद्यार्थी आंदोलना मार्फत तीव्र तीव्र आंदोलनं करण्यात येईल असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष धिरज तेलंग यांनी असा इशारा दिला. यावेळी सम्यक चे शहर अध्यक्ष आशिष बोरेवार, तालुकाध्यक्ष अंकित खोब्रागडे, तालुका उपाध्यक्ष निखिल खोब्रागडे, तालुका मीडिया प्रभारी प्राषिक खांडेकर शहर उपाध्यक्ष सुकेशिनी बेंदले, शहर महासचिव किनारा खोब्रागडे, राहुल मासळकर , शुभम रायपूरे, अनुप रायपुरे, अमन खोब्रागडे, इत्यादींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here