परिचारिका श्रीमती रिता राय यांना उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दिला निरोप

0
731

परिचारिका श्रीमती रिता राय यांना उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दिला निरोप
राजुरा : काल दि. 28 तारखेला उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे परिचारिका श्रीमती रिता राय यांना निरोप देण्यात आला. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर कुळमेथे सर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय राजुरा तसेच डॉक्टर डुकरे सर, डॉक्टर शेख, डॉक्टर डाहूले मॅडम, सौ मनीषा तोडके आदीची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होती.
यावेळी कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती श्रीमती राय यांना अध्यक्षांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील आयुष्य करिता सर्व डीसीएचसी कर्मचारी वृंदा तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन एस मेश्राम यांनी तर आभार साबीर शेख यांनी मानले. कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन निरोप समारंभाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here