पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा आम आदमी पार्टी कडून जाहिर निषेध
चंद्रपूर : TV9 चे प्रतिनिधी नीलेश डाहाट यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्याकडून जबर मारहाण करून जखमी करण्यात आले. सदया त्यांच्या वर सरकारी दवाखाना येथे उपचार सुरु आहेत.
शिवसेनेचे युवा सेना समन्वयक सहारे आणि पवन नगराळे यानी इंदिरानगर भागात देशोन्नती प्रतिनिधी विनोद बदखल आणि tv9 प्रतिनिधी नीलेश डाहाट गप्पा करत असताना सहारे आणि नगराळे यानी तेथे पोहचत अवैध धंदे ची बातमी प्रकाशित केल्यावरुन वाद निर्माण केला व तसे ते शांत पण झाले.
मात्र घटना स्थळ वरुन घरी जात असताना नीलेश डहाट यांचा सहारे आणि नगराळे यानी पाठलाग करून रामबाग वसाहत जवळ माता मंदिर जवळ लाथा बुकयांनी मारहाण केली. तसेच सिमेंट गट्टू ने मारले यात नीलेश डाहाट यांना पाठीवर पोटावर जबर मार व ओठावर टाके बसले. अश्या गुंड शिव सैनिकांचा आम आदमी पार्टी जाहिर निषेध करते. आम आदमी पार्टी चे शिष्टमंडळ नीलेश डाहाट यांना शासकीय रुग्णालयात भेट देउन तब्येतिची विचारपुस केली व पोलिस प्रशासना कडून आरोपी वर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करत पत्रकार संरक्षण कायदा अमलात आणण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आप चंद्रपुर जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राइकवार, सोशल मीडिया हेड राजेश चेडगुलवार, राजू कूड़े महानगर सचिव, महानगर उपाध्यक्ष सिकन्दर सागोरे, दीपक लीपाने, दिलीप तेलंग तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.