नांदाफाटा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
नितेश शेंडे, प्रतिनिधी
नांदाफाटा : राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांचा १० ऑक्टोबरला वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता नांदा येथील युवकांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. नांदा, बीबी,आवारपूर औद्योगिक परिसरातील १०१ युवक रक्तदान करुन वाढदिवस साजरा करणार आहेत. नांदाफाटा येथील सांस्कृतिक भवनामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. सकाळी १० : ३० वाजतापासून रक्तदान शिबीर सुरु होणार असून कार्यक्रमाकरीता राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांचे सह चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार बाळू धानोरकर यांची विशेष उपस्थित असनार आहे. परिसरातील नवयुवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आव्हान सतिष जमदाडे , महेश राऊत , हारुण सिद्दिकी यांनी केले आहे. १०१ रक्तदात्यांना आरो फिल्टर थंड पाण्याची कॅन व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला जाणार आहेत