किराणा दुकानाच्या आड सुगंधीत तंबाखूची विक्री

0
749

किराणा दुकानाच्या आड सुगंधीत तंबाखूची विक्री

■ केंद्र बिंदू बल्लारपूरातून
■ होलसेल व्यापारी यात गुंतलेले
■ अन्न व औषध प्रशासनाचे जाणिव पुर्वक दुर्लक्ष

बल्लारपूर तालुका प्रतिनिधी : राज जुनघरे

बल्लारपूर तालुक्यात सुगंधीत तंबाखूची व गुटख्याची अवैध ठोक विक्री केली जात असल्याचे सर्व श्रृत असुन ग्रामीण भागातील किराणा होलसेल व्यापारी, उद्योजक व मोठी लाबी सक्रिय आहेत. हा व्यवसाय राजरोसपणे सुरू असुन अन्न व औषधी प्रशासन विभाग जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत आहेत. या व्यवसायाला आशिर्वाद कुणाचा आहे आणि पाठबळ कुणाचे असा प्रश्न निर्माण होतो आहे.
राज्यात सन २०१२ पासुन तंबाखू, निकोटिन, मॅग्नेशियम, कार्बोनेट, यांचा समावेश असलेल्या अथवा स्वतंत्र पणे विक्री केल्यानंतर ज्याचे गुटख्यामध्ये रूपांतर होईल अशा पदार्थांच्या उत्पादन, साठा, वितरण किंवा विक्री यावर बंदी घालण्यात आली. सन २०१३ मध्ये परत मुदतवाढ देण्यात आली. आजही बंदी आहेच, खाण्याच्या पदार्थात अॅटींकेकींग एजंट म्हणून मॅग्नेशियम कार्बोनेट च्या वापरात निर्बंध असल्याने त्या आधारे ही बंदी टाकण्यात आली आहे. धुम्रपानाबरोबरच तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. हे सर्व विदीत आहे. नागरीकांचे आरोग्य रक्षण करण्याच्या दृष्टीने सरकारने सुगंधीत तंबाखू, गुटखा उत्पादन तथा विक्रीवर बंदी घातली आहे. असे असताना अवैध मार्गाने बल्लारपूरातुन किराणा मालासोबत राजरोसपणे वाहतूक व विक्री होत आहे. बंदी असुनही शहरापासून गाव, खेळे, पाडे, वस्त्यांमध्ये खर्रा-गुटखा खुल्लेआम व सहजपणे उपलब्ध होत आहे. या सुगंधीत तंबाखू विक्री करणाऱ्यांचा स्थानिक शासन प्रशासना सोबत किती मधुर व अर्थपूर्ण संबंध असणार हे विशेष…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here