प्रियदर्शनी विद्यालय रामपूरचे सुयश
गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन केला सत्कार

राजुरा : विद्या शिक्षण प्रसारक मंडळ चुनाळा द्वारा संचालित प्रियदर्शनी विद्यालय रामपूर येथील विद्यालयाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १०) च्या परीक्षेत ९२ टक्के निकाल लावीत घवघवीत यश मिळविले आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला एकूण बेचाळीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी एकोनचाळीस विद्यार्थी पास झाले तर तीन विद्यार्थी नापास झाले असून चार विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले असून सोळा विद्यार्थी प्रथम श्रेणीत, अठरा विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर पाच विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही उत्तम निकालाची परंपरा कायम राखली असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, सचिव तथा मुख्याध्यापक मनोज पावडे, धोपटाळा चे सरपंच राजू पिंपळशेंडे, उपसरपंच रंभु कमटम, सदस्य राजू येल्लया, रामपूरचे सरपंच वंदनाताई गौरकार, उपसरपंच हेमलताताई ताकसांडे, आर्वीच्या सरपंच शालूताई लांडे, उपसरपंच सुभाष काटवले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार केला यावेळी पालक मारोती आस्वले, भाऊराव चोथले, शिक्षक नितीन ठाकरे, महेंद्र मंदे, ममता नंदुरकर, श्रीकृष्ण गोरे, इंद्रराज वाघमारे, रमाकांत निमकर उपस्थित होते.