सन्मान:तुकडोजी महाराजांच्या गुरूकुंज आश्रमातील माती..अयोध्येतील राम मंदिराच्या पायाभरणीत.

0
328

सन्मान:तुकडोजी महाराजांच्या गुरूकुंज आश्रमातील माती..अयोध्येतील राम मंदिराच्या पायाभरणीत.

impact 24 news
प्रतिनिधी /देवेंद्र भोंडे

अमरावती{ गुरुकंज मोझरी } -:
येत्या पाच ऑगस्ट ला अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
अयोध्येतील ऐतिहासिक अशा राम मंदिराच्या पायाभरणीत देशातील विविध धार्मिक स्थळे व पवित्र अशा नद्यांचे जल टाकले जाणार आहे.दरम्यान श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासातर्फे अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरूकुंज आश्रमातील माती मागीतली सुद्धा होती.त्याच पार्श्वभूमीवर आज पहाटे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांच्या हस्ते ही माती जितेंद्रनाथ महाराज यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली आहे.ते ही माती अयोध्येला घेऊन जाणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज मोझरी येथील तुकडोजी महाराजांच्या गुरूकुंज आश्रमाला अनन्य महत्व आहे.
राज्यातील महत्वाच्या धार्मिक स्थळामध्ये या धार्मिक स्थळाचा सहभाग आहे. तसेच सर्वधर्म समभावाची शिकवण येथे दिल्या जाते. तसेच दरवर्षी येथे लाखो भक्त तुकडोजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.म्हणुनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीची माती ही राम मंदिराच्या उभारणीसाठी मागीतली होती.तुकडोजी महाराज यांच्या प्रार्थना मंदिरा समोर असलेल्या अस्ति विसर्जन कुंडा जवळील माती काढन्यात आली. आता ही माती अंजनगाव सुर्जि येथील श्री देवनाथ मठाचे श्रीनाथ पिठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज यांच्या मार्फत ती अयोध्येत नेली जाणार आहे..

*_”जितेंद्रनाथ महाराज यांना प्रधानमंत्री कार्यालया मार्फत या सोहळ्याचे निमंत्रण आले आहे._”*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here