अनिल धारकर! बहुआयामी व्यक्तिमत्त्व! जयंत माईणकर

0
509

अनिल धारकर! बहुआयामी व्यक्तिमत्त्व!
जयंत माईणकर

पत्रकार अनिल धारकर गेले!

ही बातमी मला 34/35 वर्षे मागे घेऊन गेली. मी तेव्हा मुंबईत आलेलो नव्हतो. यवतमाळला छोट्या वृत्तपत्रात पत्रकारिता करत होतो.पण वर्षातून एकदा तरी मुंबईत येन असे. असाच मुंबईहून वापस जात असताना हातात डेबोनेर चा अंक आला. बघणीय छायाचित्रं☺️😊 पाहून मी editorial वाचायला लागलो. स्त्री या विषयावर असलेल्या या लेखाची सुरुवात मला आजही लक्षात आहे. “Women an odd kind of species; odd because ,actually it outnmbers men in all fields but still dependent on men…” अग्रलेखाची सुरुवात मला आवडली आणि लक्षातही राहीली. त्याआधीच धारकर , एक इंजिनिअर असलेल्या व्यक्तीने नंतर जर्नालिझम मध्ये प्रवेश केला ही माहिती मिळवली होती. त्या लेखाखाली नाव होत अनिल धारकरांचं
माझा आणि धारकरांचा संबंध कधीही आला नाही. किंवा आम्ही कधीही बोललो नाही. अरुण साधूंच्या छत्राखाली वाढत असताना धारकरांशी बोलण्याची कधीही गरजही वाटली नाही. डेबोनेर नंतर मिड डे ते टाइम्स ग्रुप ते टाटा literary फेस्टिव्हल चे एक आधारस्तंभ हा त्यांचा प्रवास. त्यांचा ड्रेस चुरीदार, कुर्ता, जाकीट आणि खांद्यावर एक शबनम बॅग हा पर्मनंट ! पत्रकारांच्या एका सर्कलमध्ये त्यांचं नाव ‘जाकीटवाला’ होत. टाइम्स ग्रुपमध्ये असताना चित्रपट,कला,याबरोबरच इतर सर्व विषयावर ते लिहीत.मात्र राजकारणावरच त्यांचं लिखाण मला सखोल वाटत नव्हतं.प्रेस क्लब मध्ये ते क्वचित यायचे. दरम्यान त्यांची ब्रिटिश आणि पाकिस्तानी ओरिजिन असलेली कवयित्री पत्नी इम्तियाज आणि मुलगी अभिनेत्री आयेशा यांची माहिती मिळाली. गेल्या दशकात धारकर जोडप्याचा डायवोर्स झाला आणि त्यापाठोपाठ एक गमतीदार बातमी पहायला मिळाली. इम्तियाज दुसर लग्न करणार होती. बातमीतील उल्लेखाप्रमाणे अनिल धारकर पत्नीला म्हणाले होते ,ते तिच्या दुसऱ्या लग्नात ‘बेस्टमॅन’ व्हायला तयार आहेत.त्यामुळे त्यांना एक मेजवानी मिळेल. अर्थात इम्तियाजनी तू माझ्या दुसऱ्या लग्नात बेस्ट मॅन बनू शकत नाही असं म्हणत उडवून लावलं. पण आयुष्यातल्या अशा गंभीर घटनेकडे पाहण्याचा त्यांचा कॅज्युअल दृष्टीकोन दिसला.
धारकर multi faceted personality होते. उदारमतवादी होते.माझी श्रद्धांजली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here