लाखो रुपयांचा शासकीय महसूल बुडवत तामसी रिठ येथे वैनगंगा नदी रेती घाटावरून अवैधरित्या रेतीचे उत्खनन, लिलावधारकांडून प्रशासनाची दिशाभूल

0
787

लाखो रुपयांचा शासकीय महसूल बुडवत तामसी रिठ येथे वैनगंगा नदी रेती घाटावरून अवैधरित्या रेतीचे उत्खनन, लिलावधारकांडून प्रशासनाची दिशाभूल

कोरपना(चंद्रपूर): तालुक्यातील ग्रामपंचायत भारोसा अंतर्गत तामसी रिठ येथील वैनगंगा नदी रेती घाटाचा लिलाव झाला आहे. येथील 1 हेक्टर आराजी असलेल्या 1767 ब्रास रेती साठ्याचा लिलाव करण्यात आला आहे. मात्र या घाटावरील रेतीची जेसीबी व पोकलँड सारख्या मोठमोठ्या मशीनच्या साहाय्याने अवैधरित्या उत्खनन करून रात्रपाळीत वाहतूक केली जात आहे.
स्थानिक तलाठी तसेच तालुकास्तरीय महसूल प्रशासन यांना या होणाऱ्या अवैध रेती उत्खननाची माहिती नाही का? स्थानिक प्रशासनाच्या साट्यालोट्यातूनच हा गंभीर प्रकार चालला का? असे एक ना अनेक प्रश्न सामान्य जनतेला पडले आहे. स्थानिक ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचेही आर्थिक हितसंबंध या गैरप्रकारात गुंतल्याची चर्चा स्थानिक परिसरात चांगलीच रंगली आहे.
प्राप्त माहितीनुसार या रेती घाटातून दिवसाने ट्रॅक्टरच्या साहाय्याने रेतीची वाहतूक केली जाते. मात्र रात्री 11 वाजेनंतर जेसीबी, पोकलँड या मोठमोठ्या मशीनने रेतीचे अवैध उत्खनन करून पाचशे ते सातशे फूट हायव्याच्या साहाय्याने रेतीची वाहतूक करण्यासाठी गब्बर रेती चोरटे धस्तावलेले दिसून येत आहेत. या चोरट्या वाहतुकीला खतपाणी घालण्याचे काम स्थानिक राजकारणी तसेच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून होतांना दिसून येत आहे.
सदर रेती घाटावरून 1767 ब्रास रेती साठ्याचा लिलाव शासनाने केला आहे. येथील रेतीची वाहतूक करून आडोशाला डम्पिंग करण्यात येत आहे. यात चार ते सहा गब्बर रेती माफियांनी अमाप पैसा कमविण्याच्या नादात अवैध रेती तस्करीचा सपाटा चालविला आहे. रात्रपाळीत घाटावर येणाऱ्यांकडे लक्ष ठेवण्याकरिता चोहोबाजूंनी माणसे ठेवली असून रेती घाटावर जाण्यास मनाई करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात अरेरावी करत लिलाव झालेल्या रेती ब्रास पेक्षा जास्त रेतीचा उपसा करण्याचा गोरखधंदा शासकीय नियमाची पायमल्ली करत सुरु आहे.
अव्वाच्या सव्वा ब्रास रेतीची उचल करून डम्पिंग केली जाऊन बेभाव विक्री करून अमाप पैसा कमावण्याचा घाट बिनधोकपणे रेती मफियांकडून घातला आहे. याठिकाणी त्यांनी आपली माणसे ठेवली असल्याने एकट्याला जाणेही महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वनियोजित गुंडप्रवृत्तीने चार ते सहा रेती मफियांकडून गावातील काही जणांशी संगनमत करून संयुक्तीकपणे प्रशासनाला ठेंगा दाखवत येथील रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. यात आड येणाऱ्यांना आर्थिक लाभ देऊन राजकीय पदाधिकारी व शासकीय कर्मचाऱ्यांचे तोंड बंद करण्यात तर येत नाही ना हा अनुत्तरित प्रश्न निर्माण झाला असून यावर खनिकर्म विभागाकडून कठोर कारवाई केली जाईल का हे पाहणे अगत्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here