१० वि व १२ वि परीक्षा सकाळ पाळीत घ्या 

0
240
१० वि व १२ वि परीक्षा सकाळ पाळीत घ्या 
 
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे मागणी 
चंद्रपूर : कोरोनामुळे या वर्षी शैक्षणिक वर्षाला बरीच उशिरा सुरुवात झाली आणि त्याच मुळे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा एप्रिल आणि मे महिण्यात घेण्याचा शिक्षण विभागाने निर्णय जाहीर केलाय. मात्र मे महिण्यात ४७ अंश तापमान असणाऱ्या विदर्भात परीक्षा घेण्यास अनेक पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी विरोध दर्शविला असून  ८ ते ११ वाजता  हि परीक्षा सकाळ पाळीत घेण्याची विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
मुलांच्या जीवनात अतिशय महत्वाचा शैक्षणिक टप्पा म्हणजे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा आहे.  कोरोनामुळे या वर्षी मुलांचं निम्मं शैक्षणीक वर्ष वाया गेलं आणि आत्ता कुठे अभ्यासाची गाडी रुळावर यायला सुरुवात झाली आहे. त्यातच काल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर केली आणि तिकडे विदर्भातील पालकांना भर हिवाळ्यात घाम फुटला आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्या प्रमाणे बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १ ते २२ एप्रिल आणि लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे पर्यंत घेण्यात येणार आहे. तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा ९ ते २८ एप्रिल आणि लेखी परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे पर्यंत घेण्यात येईल. राज्यातील इतर भागात या दिवसात तापमान ४० अंशांच्या घरात राहतं मात्र विदर्भात या दरम्यान दररोजचं तापमान ४५ ते ४७ अंशांच्या घरात असतं. मग अशा लाही-लाही करणाऱ्या गर्मीत विद्यार्थी परीक्षा देणार तरी कशे? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे   ८ ते ११ वाजता  हि परीक्षा सकाळ पाळीत घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती आमदार परिभाताई धानोरकर यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.  त्यासोबतच जिल्ह्यातील इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषय शिक्षकाची भरती तातडीने करावी तसेच सुष्मजीवशास्त्र या विषयाला जीवशास्त्र या विषयाला समक्ष ठरून मान्यता देण्याची विनंती करण्यात आली.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here