बल्लारपूरात “माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारी” संवाद कार्यक्रम
बल्लारपूर, किरण घाटे । आज सकाळी 11 वाजता नाटय गृह कलामंदिर बल्लारपुर येथे जिल्हाधिकारी चंद्रपुर यांच्या संकल्पनेतुन उदयास आलेल्या “माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारी” यावर संवाद कार्यक्रम तहसिल कार्यालय बल्लारपुर, नगर परीषद बल्लारपुर आणि संवर्ग विकास अधिकारी बल्लारपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आला होता. या संवाद कार्यक्रमात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले, न. पा. बल्लारपुरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, पंचायत समिती सभापती इंदिरा पिपरे, बल्लारपुर तालुक्यातील जि. प. सदस्य, प. स. सदस्य, सर्व सरपंच, न.पा. सदस्य तसेच बल्लारपुर व राजुरा येथिल सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी बल्लारपुर तालुक्यातील स्थानीक स्वराज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांना सुचना केली. कोव्हीड -19 च्या दुस-या लाटेची शक्यता लक्षात घेता आपआपल्या क्षेत्रातील सर्व नागरीकांना कोव्हीड -19 च्या त्रिसुत्रीचे पालन करण्यासाठी सर्वतोपरी प्रवृत्त करावे. जन जागृती करावी असे आवाहन केले. तदवतचं आपल्या क्षेत्रातील सर्व व्यक्तींना मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, सानीटायझरचा वापर करणे या साठी सर्वांना प्रवृत्त करणे असे ही या वेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी सांगितले.
बल्लारपुर पेपर मिल व कोळसा खाणी येथिल अधिकारी व डाँक्टर यांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कामगाराच्या कोव्हीड-19 ची तपासनी करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी राहुल कर्डिले खाजगी डॉक्टरांनी कोरोना सदृश्य रुग्णांची कोरोना तपासनी करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे असे आवाहन देखिल या संवाद कार्यक्रमातुन करण्यात आले. उपरोक्त आयोजित कार्यक्रमासाठी उप-विभागीय अधिकारी बल्लारपुर संजयकुमार डव्हळे यांनी कोरोना-19 व त्रिसुत्री बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन विजयकुमार सरनाईक न.पा. बल्लारपुर, आभार प्रदर्शन तहसिलदार संजय राईंचवार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीततेसाठी स. वि. अ. किरणकुमार धनावडे, जयंत कातकर अति. मुख्य अधिकारी, रमेश कुळसंगे ना. त.बल्लारपुर, सी. जे. तेलंग ना. त. बल्लारपुर, अजय मेकलवार अ.का.व सर्व नगर परीषद व तहसिल कार्यालयीन कर्मचारी वृद यांनी सहकार्य केले.
