डॉक्टरांसह सफाई कामगारांचेही पालकमंत्र्यांनी मानले आभार

0
314

 

वन अकादमीतून आतापर्यत 297 दाखल ;207 डिस्चार्ज

पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांची कोविड केअर सेंटरला भेट

चंद्रपूर दि. 27 जुलै:कोरोना प्रतिबंधात्मक व भविष्यकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने तसेच बाधितांना दैनंदिन अत्यावश्यक सोयी, सुविधा व सेवा सुलभरीतीने मिळाव्यात यासाठी वन अकादमी येथे कोविड केअर सेंटर उभारले आहे. वन अकादमी येथील कोविड केअर सेंटरला राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, नोडल अधिकारी डॉ. खांडरे, वन अकादमीचे अपर संचालक प्रशांत खाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

दरम्यान, पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी वन अकादमीला भेट देऊन बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून येथे येणाऱ्या बाधितांची गैरसोय होऊ नये यासाठी बेड संख्या वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्यात.

वन अकादमी येथील सेंटरला आतापर्यंत एकूण 297 बाधितांना ठेवण्यात आले असून 207 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याठिकाणी महानगरपालिका, जिल्हा सामान्य रुग्णालयातील 5 वैद्यकीय अधिकारी, एक नोडल अधिकारी, दोन आशा सेविका, असे एकूण 15 कर्मचारी अविरत सेवा देत आहेत. या सफाई कामगारांचे देखील पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आभार मानले.या काळामध्ये कोरोना बाधितांची सेवा करण्यासारखे मोठे कोणतेच काम नाही असे मत देखील त्यांनी याठिकाणी व्यक्त केले.

कोरोना बाधितांना राहण्यासाठी एखाद्या पंचतारांकित हॉटेल सारखी व्यवस्था केलेली आहे. हि राज्यातील सर्वोत्तम व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर असून त्यामध्ये स्वतंत्र खोली व बाथरूम वापरण्यास दिले आहे. बाधित रुग्णाच्या तपासणीसाठी स्वतंत्र खोली तसेच उत्तम खाणपाणाची व्यवस्था, स्वच्छ पाणी, पोषण आहार व दिवसातून तीनदा आरोग्य तपासणी केल्या जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here