शहरातील व तालुक्यातील घरकुल योजनेचे लाभार्थी निधी पासून वंचित :- राजु झोडे
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी आवास योजनेच्या मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्याबाबत उलगुलान संघटनेचे निवेदन

प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी आवास योजने अंतर्गत मुल शहरातील वरील योजनेच्या मंजुर लाभार्थ्यांना बऱ्याच दिवसापासून आर्थिक लाभ मिळालेला नाही.कित्येक कुटुंबांचे घरसुद्धा बांधून झाले व काही लाभार्थ्यांचे घर अर्धवट तयार होऊन आहेत. परंतु त्यांचा निधी अजून पर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे या योजनेअंतर्गत सर्व पीडित मंजुर लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सदर वरील योजनेतील लाभार्थी आर्थिक निधी पासून वंचित आहेत. त्याचप्रमाणे शौचालय बांधकामाची रक्कम अजून पर्यंत सदर लाभार्थ्यांना मिळालेला नाही. वरील बाब अतिशय गंभीर असून सदर योजनेअंतर्गत मूल शहरातील व तालुक्यातील जे काही लाभार्थी आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी योजना याचा निधी तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा याकरिता उलगुलान संघटना शाखा मुल द्वारा नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जर वरील आवास योजनेतील निधी लाभार्थ्यांना तात्काळ मिळाला नाही तर उलगुलान संघटना आक्रमक पवित्रा घेणार व वरील मागणीसंदर्भात उग्र आंदोलन करणार. आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार आपण व संबंधित प्रशासन राहणार असा इशारा उलगुलान संघटनेच्या वतीने देण्यात आला.
निवेदन देताना उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, जिल्हा संयोजक प्रशांत उराडे, शाखा अध्यक्ष निखिल वाढई, सुजित खोब्रागडे, मनोज जांभुळे, प्रणित पाल, आकाश येसनकर, रोहित शेंडे, निकेश सुखदेवे, सुरेश येडनुत्तलवार , आकाश खोब्रागडे, नथुजी महाडोळे, सत्यवान लेनगुरे गजानन गुरनुले तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.