मॅजिक बसच्या वतीने पोंभूर्णा येथे मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न
पोंभूर्णा: मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन संस्था चंद्रपूर , जिल्ह्यातील निवळक तालुक्यात काम करीत आहे. मॅजिक बसच्या माध्यमातून इयत्ता 6 वि ते इयत्ता 9 वि च्या विद्यार्थ्यांनसाठी खेळाच्या माध्यमातून शिक्षण, जीवन कौशल्य विकास कार्यक्रम स्केल कार्यक्रम तालुक्यातील 2140 विद्यार्थ्यांसोबत राबविल्या जात आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह पंचायत समिती पोंभूर्णा येथे मॅजिक बस इंडिया फौंडेशनच्या वतीने मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला पोंभूर्णा तालुक्यातील जी.प उच्च प्राथमिक व माध्यामिक , खाजगी अश्या एकूण 35 शाळांचे मुख्याध्यापक तथा सहाय्यक शिक्षक उपस्थित होते . मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन च्या वतीने पोंभूर्णा तालुक्यातील 35 शाळेत खेळातून विकास शिक्षण, जीवन कौशल्य हा उपक्रम राबविल्या जात आहे.
मुख्याध्यापक कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून गट शिक्षणाधिकारी श्री बाबुराव मडावी तर प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी श्री सोनपुरे, केंद्रप्रमुख विलास रोहणकर, प्रकाश कुंभरे, परशुराम वेलादी, विनायक औतकर तसेच मार्गदर्शक तथा प्रमुख पाहुणे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे उपस्थित होते.
ही कार्यशाळा गटविकास अधिकारी पंचायत समिती पोंभूर्णा श्री साळवे व गटशिक्षणाधिकारी श्री मडावी यांचे निर्देशनात व जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री प्रशांत लोखंडे यांचे मार्गदर्शनात पार पडली.
कार्यशाळा पार पाडण्याकरिता तालुका व्यवस्थापक हिराचंद रोहणकर, शाळा सहाय्यक अधिकारी बजरंग वक्टे , सपना देऊरकर, प्राची वेल्हेकर, सचिन दळवी यांचे मोलाचे सहकार्य होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन तालुका व्यवस्थापक हिराचंद रोहणकर यांनी तर आभार बजरंग वक्टे यांनी मानले .
