चंद्रपूरातील पाेलिस मुख्यालयाजवळ अवैध रेतीचे वाहन जप्त ! नायब तहसीलदार सचिन खंडाळेची कारवाई !

0
563

चंद्रपूरातील पाेलिस मुख्यालयाजवळ अवैध रेतीचे वाहन जप्त ! नायब तहसीलदार सचिन खंडाळेची कारवाई !

🟩💠🟢🟣चंद्रपूर 🟢🟡🟪किरण घाटे 🟢🟡🟧भर दिवसा विना परवाना रेती वाहतुक करणारे वाहन आज गुरुवार दि. २८जानेवारीला महसुल विभागाचे नायब तहसीलदार सचिन खंडाळे यांनी पकडुन त्यास दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा केले असल्याचे खात्रीलायक व्रूत्त आहे .🟩🟡🟢🟨🟣दरम्यान ही कारवाई त्यांनी येथील स्थानिक उपविभागीय अधिकारी राेहन घुगे तथा तहसीलदार निलेश गाैंड यांचे मार्गदर्शना खाली गुप्त माहितीच्या आधारे केली आहे. 🟢🟡🟨💠या घटनेतील वाहन चालकाचे नांव सचिन निळकंठ मेश्राम असुन ताे सिंताळा येथील रहिवाशी असल्याचे कळते .(हाँफटन)वाहनातुन आज दुपारी १२:३०ते १वाजताच्या दरम्यान शहरातील पाेलिस मुख्यालया जवळील ताडाेबा राेड वरुन ताे रेतीची अवैधरित्या वाहतुक करीत हाेता .🟢🟡💠🟩🟪महसुल विभाग तथा खनिकर्म विभागाच्या कारवायां सध्या चंद्रपूर जिल्ह्यात माेठ्या जाेमात सुरु असतांना रेती तस्कर नजर चुकवुन रेती आणण्यांचा प्रयत्न करीत जरी असले तरी अश्या रेती माफियां विराेधात या विभागांनी आपली कंबर कसली हे मात्र तेवढेच खरे आहे .🟡🟨🟧🟪🟩मध्यरात्री जिव धाेक्यात टाकुन एसडीआे राेहन घुगे यांनी मध्यंतरी १८०ब्रास रेतीचा साठा जप्त केल्याचे सर्वश्रुतच आहे तर तहसीलदार निलेश गाैंड यांनी एकाच दिवशी सहा अवैध रेती वाहनांना पठाणपुरा मार्गावर दंडात्मक कारवायांसाठी ताब्यात घेतले हाेते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here