जिवती चे उपसभापती महेशजी देवकते तेंदूपत्ता आणि आपटा संकलन व विक्रीच्या जिल्ह्यास्तरीय तक्रार निवारण समिती सदस्य पदी नियुक्त

0
468

जिवती चे उपसभापती महेशजी देवकते तेंदूपत्ता आणि आपटा संकलन व विक्रीच्या जिल्ह्यास्तरीय तक्रार निवारण समिती सदस्य पदी नियुक्त

जिवती (प्रशांत मोरे) : अनुसूचित क्षेत्रातील तेंदूपत्ता आणि आपटा संकलन व विक्रीच्या व्यवस्थापनाबाबत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेशजी देवकते यांची सदस्य म्हणुन निवड करण्यात आली आहे.
अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींच्या हिताच्या व कल्याणाच्या दृष्टीने महाराष्ट्र वन उत्पादन अधिनियम 1997 मध्ये सुधारणा केली आहे. त्यामध्ये बांबू व तेंदुसह सर्व गौण वनउपजांचा समावेश केला आहे. त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील गौण वनउपजांचा मालकी ग्रामसभेकडे पंचायतिकडे विहित करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हाअंतर्गत अनुसूचित क्षेत्र (पेसा) अंतर्गत गावे आहेत त्यामध्ये राजुरा, विरूर, देवाडा, येरगव्हाण,वनसडी,जिवती, लांबोरी एकूण आठ परिक्षेत्र समाविष्ट आहेत.शासन निर्णयानुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) तेदुपाने गोळा करणाऱ्या गावातील ग्रामसभा आणि पंचायत कोणत्या पद्धतीने तेंदूपत्ता किंवा अपटा यांची विल्हेवाट लावु इच्छिछे यासाठी ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामसभेचा ठराव प्राप्त करते.
ग्रामसभा अथवा ग्रामसभेत नियुक्त केलेले प्रतिनिधी अथवा समितीच्या काही तक्रारी अडीअडचणीसाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती शासन निर्णय नुसार स्थापन झाली असून प्रमुख अधिकारी असणाऱ्या या समिती मधे जिल्हाधिकारी यांचे कडून पंचायत समिती जिवती चे उप सभापती श्री महेश देवकाते यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा स्तरावरील या महत्त्वाच्या समिती निवड झाल्याने या माध्यमांतून ग्रामीण, आदिवासी भागातील सामान्य नागरिकांना वन उपज व तत्संबंधित समस्यांचे निराकरण प्राधान्यक्रमाने करण्यात येईल आणि ग्रामीण आदिवासी भागातील समस्यांना जिल्हा स्तरावर प्रशासन आणि जनतेच्या समन्वयातून सोडवण्याचा निर्धार समितीचे सदस्य उपसभापती यांचे कडून करण्यात आला आहे.
सामान्य नागरिकांसाठी असणाऱ्या महत्वाच्या समितीत ग्रामीण भागातील पात्र नेतृत्वाला संधी मिळाल्या बद्दल उपसभाती देवकते यांचे मित्र मंडळ आणि ग्रामीण भागातील जनतेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here