विदर्भातील मेकअप आर्टिस्ट कल्याणी सराेदे ठरली प्रथम पुरस्काराची विजेता !

0
722

विदर्भातील मेकअप आर्टिस्ट कल्याणी सराेदे ठरली प्रथम पुरस्काराची विजेता !

कन्हान गावंवासियांनी केले तिचे ताेंड भरुन काैतुक !

किरण घाटे :- विदर्भातील सुपरिचीत कन्हान-कांद्री या गावची मुळ रहिवाशी असणां-या २८वर्षिय साेनाली सराेदे या तरुणीने नुकत्याच नागपूरात पार पडलेल्या मेकअप आर्टिस्ट स्पर्धेत भाग घेवून प्रथम क्रमांक पटकविला .उपराजधानी नागपूरात ही स्पर्धा आर .एस.ग्रुपचे संस्थापक जीतू अमरे यांनी आयोजित केली हाेती .सदरहु स्पर्धेत एकंदर ४०स्पर्धकांनी भाग घेतला हाेता. ही आयाेजित स्पर्धा बघण्यांसाठी ४००ते ४५०प्रेक्षक सभाग्रूहात उपस्थित हाेते .🟣🟢🌼आर. एस .ग्रुपचे संताेष माने , राहुल शाहनवाज , बाँलीवुडचे मेकअप आर्टिस्ट रुबी शेख तदवतच सारा शेख यांचे शुभहस्ते स्पर्धेत प्रथम विजेता ठरलेल्या कल्याणी सराेदेला एक ट्राफी , राेख दहा हजार रुपये व काही भेट वस्तु देवून सन्मान पत्राने गाैरविण्यात आले .२०२०चा मेकअप आर्टिस्ट अवार्ड प्राप्त करणारी कल्यानी ही या आधी देखिल आंतर राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी ठरली आहे .अतिशय मेहनतीच्या बळावर व सातत्याने लक्ष केंद्रीत करुन आपण या स्पर्धेत हे य़श संपादन केले आहे अशी प्रतिक्रिया साेनाली सराेदेने या प्रतिनिधीशी बाेलतांना दिली .दरम्यान विदर्भातील अनेकांनी तिच्या या कलेचे गाेड काैेतुक करुन अक्षरशा तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अधिवक्ता मेघा धाेटे, मायाताई काेसरे व प्रभा अगडे यांचे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलला ( महिला व्यासपीठाला) आपण कालच रुजू झाल्याचे कल्याणी सराेदेने या वेळी सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here