लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन घुग्घुस द्वारा दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य साहित्य वितरण कार्यक्रम
लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पांढरकवडा ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य साहित्य वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात व्हीलचेअर,आराम खुर्ची,आधार काठी, शौचालय चेअर, अशा विविध प्रकारच्या आरोग्य साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन चे उपव्यवस्थापक श्री.दिपक साळवे यांच्या हस्ते झाले. ग्रामपंचायत पांढरकवडा मा.सरपंच श्री सुरज तोतडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायत सचिव कु.ऋतुजा कोरडे, पशु वैद्यकीय अधिकारीं डॉ.विनोद रामटेके,पोलीस पाटील श्री.सचिन टिपले,आशावर्कर सौ.लक्ष्मी पाझारे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात एकूण ७९ दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये व्हीलचेअर, आराम खुर्ची, आधार काठी, शौचालय चेअर यांचा समावेश होता.
या उपक्रमाबद्दल बोलताना श्री.दिपक साळवे म्हणाले, “दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सुधारणा करणे हे आमचे सामाजिक दायित्व आहे. लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड नेहमीच अशा उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी तत्पर असतात.”
कु ऋतुजा कोरडे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि म्हणाल्या, “या आरोग्य साहित्यामुळे गावकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल होईल. ग्रामपंचायत नेहमीच अशा सामाजिक कार्यांना प्रोत्साहन देत राहील.”
कार्यक्रमाचे संचालन श्री.अनुराग मत्ते यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीरंग पोतराजे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शीतल कौरासे, प्रिया पिंपळकर,मंजुषा वडस्कर यांनी अथक प्रयत्न केले.
या कार्यक्रमामुळे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद या उपक्रमाची यशस्विता दर्शवत होता.