आदिवासी विद्यार्थ्यांची हेळसांड खपवून घेणार नाही : आमदार डॉ देवराव होळी

0
531

आदिवासी विद्यार्थ्यांची हेळसांड खपवून घेणार नाही : आमदार डॉ देवराव होळी

शासकीय आदिवासी वसतिगृहात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे!

सुखसागर झाडे । गडचिरोली विधानसभा मतदार संघातील पोटेगाव येथील शासकीय आदिवासी वसतिगृह येथे आज दि. १९मार्च ला आमदार डॉ देवराव होळी यांनी सदिच्छा भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या व येथील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या सोबत संवाद साधला. येथे नवनिर्माण होत असलेल्या दोन अद्यावत मुला मुलींचे वसतिगृहचे पाहणी आमदार डॉ देवराव होळी यांनी केले यावेळी बोलतांना आमदार डॉ देवराव होळी यांनी सांगितले शासकीय वसतिगृहातील समस्त विद्यार्थी , विद्यार्थिनी यांना राज्य सरकारच्या सर्व सोयसुविधा लाभ देण्यात यावे. व शासकीय वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांचे हेळसांड खपवून घेणार नाही असा इशारा दिला यावेळी प्रामुख्याने पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर , उपसभापती विलास पाटील दशमुखे, पंचायत समिती सदस्य नेताजी गावतुरे, मालता ताई मडावी भाजपा गड तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, मुख्याध्यापक ब्राम्हणकर ,शिक्षक सुधीर शेंडे, शिक्षक नैताम , एस आर मंडलवार , अधीक्षक एस आर. जाधव, प्र. अधिक्षिका बी. डी. वाळके, शिक्षक व्ही. एस. देसू व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here