घुग्घुस शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा वर्धापन दिन साजरा…
भारतीय संविधानाच्या रौप्य महोत्सव दिनानिमित्त भव्य धम्म संमेलनात नागरिकांची अलोट गर्दी
आमचा बाप एकच महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर – चंदनशिवे
पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी
घुग्घुस येथे दि.२६ व २७ जानेवारी २०२५ या दोन दिवसीय भव्य संमेलन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तृतीय वर्धापन दिन व भारतीय संविधानच्या रौप्य महोत्सव दिनानिमित्त विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर येथे बौद्ध सर्कल समिती व नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले. सर्वधर्म समभाव समाज बांधवाची शांतिपूर्वक नागरिकांची अलोट गर्दी झाली.
सर्वप्रथम विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर दिप द्विपजलीत करून,तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस माल्यार्पण, द्विपजलीत करीत सामुहिक बुध्द वंदना घेण्यात आले.
दि. २६ जानेवारी धम्म संमेलनाचे उद्घाटन अरुणाचल प्रदेशचे भंते वन्नासामी थेरो यांच्या हस्ते व संमेलनाचे प्रमुख भंते धम्मप्रकाश संबोधी थेरो, धम्मरक्षित थेरो, रत्नमनी थेरो, महातीस्स थेरो यांच्या मार्गदर्शनात उद्घाटन करण्यात आले. तसेच दुपारी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. रवि कांबळे, प्रमुख मार्गदर्शन मा. अनंत केरबाजी भवरे (औरंगाबाद) यांने सांगितले की,आंतरराष्ट्रीय स्तरावर २०२५च्या काळात भारतीय लोकशाची दुरावस्था…याला येथील व्यवस्था जबाबदार कशी…? या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच दंगलकार कवि नितीन चंदनशिवे यांचे जोरदार धडक भाषणात बोलले की,आयोजकांनी हा मंडप उभा केला आहे,येथ सम्मेलन विचारांच्या जागर या ठिकाणी आयोजित केल पण कशासाठी माझतर चांगलच डोंक फिरल होत,जरा आमच सत्र सुरू झाल आणि सूत्रसंचालन म्हणते की, भोजनाचा कार्यक्रम चालु झालेले तिकडे जा, म्हणजे जेवायला आले की,काय ऐकायला आले जेवण हि नंतर आहेवो,म्हणजे अशा कार्यक्रमाला गर्दी करासाठी जेवण काही दिवसांनी नाचनारा बायका पण आणाव मी खर बोलणारा वक्त आहे, बर बोलुन दाडी वाडून मला जाता येत नाही,मी काँग्रेसला फोडतो, भाजपाला फोडतो मी सुटल्याला वरो आहो आवडा त्याला तुडवत राहणार आमच्या बाप एकच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विषय संपला.
तसेच सांयकाळी प्रख्यात प्रबोधनकार स्वप्नील मेश्राम यांचे संगीतमय प्रबोधनाच्या कार्यक्रमात अलोट गर्दी तसेच शांतिपूर्वक पार पाडला.
तसेच सांयकाळी प्रख्यात प्रबोधनकार स्वप्नील मेश्राम यांचे संगीतमय प्रबोधनाच्या कार्यक्रमात अलोट गर्दी तसेच शांतिपूर्वक पार पाडला.
दि.२७ जानेवारी दिवसभर माता जिजाऊ,माता सावित्री,माता रमाई सावित्रीबाई फुले या त्या काळामध्ये अडचणीवर मात करून कसा शिकल्या आणि त्यांनी आपल्या कार्यामधून आम्हा महिलांना इथं बोलण्याची कशी संधी दिली त्याबद्दल माता जिजाऊ माता जिजाऊ तसेच शिवरायांना घडवले आणि त्यांना आज महाराष्ट्राचे आपले दैवत मानते आणि इतके मोठे त्यांचे आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे नाव अजमर केले असे माता जिजाऊ यांनी आपल्या मुलाला कसे घडवले या तीनही विषयावर मॅडमनी आपल्याला खूप मोलाची विविध विषयांवर माहिती देण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.स्मिता कांबळे यांनी ई.व्ही.एम बद्दल मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक माजी मंत्री (दिल्ली) डाॅ. राजेंद्र पाल गौतम यांनेही चांगलेच मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सांयकाळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार संविधान मनोहरे यांच्या प्रबोधनाच्या कार्यक्रम उत्साहात पार पाडला.
यावेळी व्यवस्थापन समिती, सल्लागार समिती,स्वागत समिती, भोजन व्यवस्था समिती, सजावट समिती, प्रसिद्धी प्रमुख, सदस्यगण तसेच आयोजक बौद्ध सर्कल समिती व नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती घुग्घुसच्या वतीने दोन दिवसीय भव्य संमेलन शांतिपूर्वक पार पडले.