बल्लारपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बॅनर वरून तणाव निर्माण

0
411

बल्लारपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बॅनर वरून तणाव निर्माण

मेहर हॉटेल बल्लारपूर चे संचालक दिनेश आसवांनी यांनी केला शिवाजी महाराज यांचा अपमान

तालुका प्रतिनिधी/रोहन कळसकर
बल्लारपूर- बल्लारपूर शहरातील भारतीय बैक आॅफ इंडिया समोरील च्या मुख्य रस्त्यावर असलेले हॉटेल मेहर चे संचालक चंदू आसवांनी यांचे पुत्र दिनेश आसवांनी यांनी रविवार ला शिव छत्रपती शिवाजी यांच्या जयंती निमित्त हॉटेल मेहर समोरील लावण्यात आलेल्या बैनर वरून वादग्रस्त परिस्थिती निर्माण केली. यामुळे तमाम शिवभक्तांच्या भावना दूखावल्या. त्यामुळे बल्लारपूर शहरातील तमाम शिवभक्तांनी नगर परिषद बल्लारपूर व पोलीस स्टेशन बल्लारपूर यांना बल्लारपूर शहरातील असलेले हाॅटेल मेहर चे संचालक चंदू आसवांनी यांचे पुत्र दिनेश आसवांनी यांच्या वर कायदेशीर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दि. 21/02/2023 ला सकाळी 11.00 वाजता नगर परिषद चौक येथे लाखो संख्येने सर्व शिवभक्त एकत्रित येऊन जय जिजाऊ जय शिवराय, हर हर महादेव च्या घोषणा करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये या करीता पोलीस प्रशासकीय तर्फे कडक बंदोबस्त व दंगा पथक ठेवण्यात आले. बल्लारपूर पोलीसांनी शिवभक्तामध्ये असलेला रोष शांत करत हाॅटेल मेहर चे संचालक चंदु आसवांनी यांना सुरक्षित ठेवुन पहीले पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ अधिकारी सोबत चर्चा करून शिव भक्तांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवभक्त हे कुठल्याही प्रकारे शांत राहण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून सर्व शिवभक्त यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोर हॉटेल मेहर चे संचालक चंदू आसवांनी यांनी माफी मागितली. तेव्हा पोलीस सुरक्षा सोबत व्यापारी संघटनेचे बबलू गिडवाणी हे सुद्धा उपस्थित होते. या वेळी या आंदोलनाचे नेतृत्व ॲड. प्रनयदादा काकडे यांनी केले. या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी चेतन पावडे, राकेश वडस्कर, प्रतिक वाटेकर, बाबा भैय्या शाहू, विवेक खुटेमाटे व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here