माजी खासदार मा. श्री. नरेशबाबू पुगलिया यांनी घेतले विधानसभेचे माजी उपसभापती अँड. मोरेश्वर टेभूर्डे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

0
320

माजी खासदार मा. श्री. नरेशबाबू पुगलिया यांनी घेतले विधानसभेचे माजी उपसभापती अँड. मोरेश्वर टेभूर्डे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन


भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू नेता आणि सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी मित्रत्वाचे संबंध ठेवणारे म्हणून परिचित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी उपसभापती अँड. मोरेश्वर विठ्ठलराव टेंभुर्डे यांचे रविवारी दिनांक 22 जानेवारी 2023 ला पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचा निधनानंतर विविध स्तरातून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात येत आहे.
काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार मा. श्री. नरेशबाबू पुगलिया यांनी सकाळी 11 वाजता चंद्रपूर शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी काँग्रेसचे अँड. अविनाश ठावरी, मनपा माजी नगसेवक देवेंद्र बेले, माजी नगसेवक अशोक नागापुरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here