क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

169

क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

दि.५ जानेवारी २०२३ गुरुवार रोजी श्री.साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली अंतर्गत प्रियदर्शिनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घुस ता.जि.चंद्रपूर येथे विविध क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य अनू खानझोडे यांचे शुभहस्ते श्री.फाल्गुन खामणकर पर्यवेक्षक, श्री.विनायक टोंगे स.शिक्षक, प्रा.संजय बाबरे, प्रा.प्रकाश सातार्डे,प्रा.वैशाली जोशी, प्रा.स्वाती आवारी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी मुलीची लंगडी, कबड्डी, खो-खो, भाला फेक, थाळी फेक, गोला फेक व रनिंग स्पर्धा घेण्यात आल्या. दुसर्‍या सत्रात प्रश्नमंजुषा, स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, सारेगामा स्पर्धा घेण्यात आले.

यात यशस्वी होणाऱ्या विद्यार्थिनींना प्राचार्य अनू खानझोडे यांचे शुभहस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी सर्व स्पर्धामध्ये सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी अथक परिश्रम घेतले.

advt