संविधान हे प्रत्येक भारतीयांचा श्वास : राजु रेड्डी

0
501

संविधान हे प्रत्येक भारतीयांचा श्वास : राजु रेड्डी

 

घुग्घुस : शहर काँग्रेस कार्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले व संविधान रक्षणाची शपथ घेण्यात आली.

काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी देशातील नागरिकांना संविधाना प्रती जागृत राहण्याचे आवाहन केले. आज देशात एक विशेष वर्गाला भारतीय संविधान मान्य नसून ते वेळोवेळी संविधान संपविण्याचा कुटील डाव आखत असतात.

दिल्ली येथील जंतर – मंतर येथे राज्यघटनेचे प्रति ही काही देशद्रोहानी जाळलयाचे मागे निरदर्शनास आले आहेत.
भारतीय संविधान प्रत्येक नागरिकांना कुठल्याही भेद भावा शिवाय बेडर पणे जगण्याचा बळ देतो हा समस्त देशवासियांचा प्राणवायू श्वास असून सर्वांनी संविधान रक्षणासाठी सज्ज रहावे अशी विनंती ही केली.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार मसुदा समितीचे प्रमुख डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसात बारा हजार पानांचे संविधान निर्माण करण्यात आले 26 नवंबर 1949 रोजी सदर संविधान राष्ट्राला समर्पित करण्यात आले. व 26 जानेवारी 1950 रोजी सदर संविधान अंमलात आले

आजच्या संविधान दिन कार्यक्रमात काँग्रेस नेते सैय्यद अनवर, शामराव जी बोबडे, रोशन दंतलवार,अनुप भंडारी,राकेश डाकुर, कुमार रुद्रारप,सुनील पाटील,देव भंडारी,साहिल सैय्यद,कपिल गोगला,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here