नेते मोठे की राष्ट्रसंत नागरीकांना प्रश्न

168

नेते मोठे की राष्ट्रसंत नागरीकांना प्रश्न
नांदा स्वागत गेटवर “बॅनर बाजी” राष्ट्रसंतांचा अपमान
यापुर्वी उपसरपंचाला थोटावला होता दंड

 

नांदा फाटा : शासनाने राष्ट्रसंत यांनी केलेल्या कामाचा सदुपयोग व्हावा या करिता विविध योजना राबविल्या एवढेच नाहीतर त्याचा नावाने मोहीम राबवून पारितोषिकाची घोषना सुध्दा केल्या. शासणाने आदेश काढून त्याची प्रतिमा ही कार्यलयात लावणे अनिवार्य केले. मात्र त्याचा कुठे तरी अपमान होताना दिसून येत असून नांदा गेट वर त्याचा रेखाटलेल्या प्रतिमेवर आपले बॅनर लावत असल्याने राष्ट्रसंतांचा गुण गान गाणारे नेते मोठे की राष्ट्रसंत असा प्रश्न नागरीकांना पडू लागला आहे.

नांदा ग्रामपंचायतीचे गेटवर राजकीय, वाढदिवस, सामाजिक कार्यक्रम, जाहीराती, नाटकाच्या प्रसिद्धी असे विविध प्रकारचे बॅनर लावण्यासाठी वापरले जात आहे प्रत्येक संबोधनातुन राष्ट्र संताचा आदर करणारेच नेते नांदा गेटवरील राष्ट्र संताच्या फोटो समोर बॅनर लावुन राष्ट्र संताचा अपमान करतांना दिसून येत आहे त्यामुळे नांदा ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी यांनी याकडे लक्ष देवून करवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नुकतीच निवडणूक पार पडली असून लगेच दिवाळी सुध्दा आली त्यामुळे बॅनर लावण्याचा धडाका सुरु झाला आहे. एकीकडे बॅनर लावणारेच हेच नेते मंडळी आपल्या संबोधनातुन पदोपदी राष्ट्रसंताचे गुणगान करतात तर दुसरीकडे राष्ट्रसंतांच्या फोटो समोर बॅनरबाजी करुन अपमान करतात नांदा ग्रामपंचायतीचे स्वागत गेटवर फलकबाजी करुन राष्ट्रसंताचा अपमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

नांदा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यानी स्वत:च्या वाढदिवसाचे बॅनर नांदागेटवर लावले होते. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी राष्ट्रसंताचा अपमान करतात असे वृत्त विविध वृत्तपत्रातुन प्रसिध्द झाल्याने ग्रामविकास अधिकारी यांनी उपसरपंचावर दंड थोटावून कारवाई केली होती.

याचा धसका घेत तेव्हापासुन मागील ४ वर्ष नांदा ग्रामपंचायतीच्या गेटवर बॅनर लावणे बंद झाले होते. परंतू निवडणूक संपताच काही दिवसापासून आता परत नांदा ग्रामपंचायतीचे गेटवर बॅनरबाजी सुरू झाली असून या मुजोर पदाधिकारी यांचा वर ग्रामविकास अधिकारी व प्रशासक कोणती कारवाई करणार याकडे स्थानिकांचे लक्ष वेधले आहे.

advt