वैद्यकीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्याचे जळगाव येथे भव्य आयोजन संपन्न!

0
440

वैद्यकीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्याचे जळगाव येथे भव्य आयोजन संपन्न!

 

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन जळगाव जिल्हा आयोजित उत्तर महाराष्ट्र आरोग्यसेवकांचा विभागीय सवांद मेळावा व वैद्यकीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन केले होते.

या मेळाव्याचे उदघाटन पाणी पुरवठा मंत्री मा.ना. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध हॉस्पिटलच्या डॉक्टर, स्टाफ नर्स सर्वांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकारीच्या आमदार किशोर आप्पा पाटील साहेब, आमदार लता ताई सोनावणे यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यासाठी नियुक्त्या करण्यात आल्या.

हे दोन दिवसीय आरोग्य शिबिर व सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख जितेंद्र गवळी व डॉ मोहिज देशपांडे आणि संपूर्ण जळगाव जिल्हा शिवसेना वैद्यकीय कक्ष टीम यांनी विशेष प्रयत्न केले.

यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबजी पाटील, आमदार लताताई सोनवणे, आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजाभाऊ भिलारे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख योगेशजी मस्के, संपर्क समन्वयक जितेंद्र सातव, डॉक्टर सेलचे नाशिक जिल्हा समन्वयक प्रथमेश पाटील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जळगाव जिल्हा संपर्क समन्व्यक जितेंद्र गवळी, डॉ मोहिज देशपांडे जळगाव जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षचे सर्व सहकारी रुग्णालय स्टाफ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here