कलाकारांच्या विविध समस्यांसदर्भात वेगाने मार्ग काढू : सुधीर मुनगंटीवार

0
421

कलाकारांच्या विविध समस्यांसदर्भात वेगाने मार्ग काढू : सुधीर मुनगंटीवार

 

 

राज्यातील कलाक्षेत्रात कार्यरत कलाकारांना विविध समस्या भेडसावत असून शासन त्यावर वेगाने मार्ग काढेल असे प्रतिपादन आज सांस्कृतिक मंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृहात आज ज्येष्ठ कलाकार श्रीमती वैजयंती कुलकर्णी आपटे, श्री जब्बार पटेल तसेच श्रीमती अलका कुबल यांनी ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वतंत्र सदिच्छा भेटी घेतल्या. यावेळी विविध विषयांसंदर्भात या कलाकारांसोबत मंत्री महोदयांची चर्चा झाली. या सर्वांनी कलाक्षेत्राच्या विविध समस्यांकडे मंत्रीमहोदयांचे लक्ष वेधले. त्यावर बोलतांना ना.श्री. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना विविध निर्देश देत या समस्यांवर कालबद्ध पद्धतीने काम करण्यास सांगितले. या सर्व समस्या लवकरच सुटलेल्या दिसतील असे ऩा.श्री मुनगंटीवार यांनी या कलाकारांना सांगितले. शासन कलाक्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही यावेळी मंत्रीमहोदयांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here