वाढीव विजबील तसेच सक्तीच्या विजबील वसुली विरोधात भाजपा अमरावती जिल्हा ग्रामीण चे आंदोलन

0
339

वाढीव विजबील तसेच सक्तीच्या विजबील वसुली विरोधात भाजपा अमरावती जिल्हा ग्रामीण चे आंदोलन

उर्जामंत्र्यांचा पुतळा जाळुन केला राज्य सरकारचा निषेध

सदानंद खंडारे

अमरावती :- कोरोना काळात जनसामान्यांना वीजबिलात सुट देऊ असे आश्वासन न देणार्या व आता शब्द फिरवुन जनसामान्यांकडुन सक्तीची वीजबिल वसुली करणार्या राज्य सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीण तर्फे जिल्हाध्यक्ष सौ निवेदिताताई दिघडे-चौधरी यांच्या नेतृत्वात तसेच भाजपा नेते, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ अनिलजी बोंडे, प्रदेश प्रवक्ते शिवरायजी कुळकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य सरकारचा निषेध म्हणुन स्थानिक विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.
यावेळी अधिकार्यांचे कक्षाचे दिवे बंद करुन तसेच ग्रीडफेल उर्जा मंत्र्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच विज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले व सक्तीच्या वीजवसुलीचा आदेश देणार्या ग्रीडफेल उर्जा मंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात येऊन राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी भाजपा अमरावती जिल्हा ग्रामीण चे सर्व सरचिटणीस, विविध आघाड्यांचे मोर्चाचे अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here