वाढदिवसानिमित्त पोलीस स्टेशनकडून ठाणेदारांना अनोखी भेट

0
563

वाढदिवसानिमित्त पोलीस स्टेशनकडून ठाणेदारांना अनोखी भेट

 

राजुरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. चंद्रशेखर बहादुरे यांच्या दिनांक 12.9.2022 रोजी 58 व्या वाढदिवसानिमित्त पोलीस स्टेशन राजूरा चे अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून रक्तदान करून अनोखी भेट देण्यात आली.

श्री. बहादुरे यांनी आजपावेतो महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खडतरपणे अविरत सेवा केली. या महिन्यात ते सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने पोलीस स्टेशन राजुरा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान करून ठाणेदार बहादुरे यांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली. तसेच पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन राजुराचे एसडीपीओ राजा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस मित्र, वेकोली कर्मचारी, सैनिक/होमगार्ड यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. सदर रक्तदान हे शासकीय रक्तपेढी चंद्रपूर यांचे कडे संकलित करण्यात आले.

यामध्ये पोलीस अधिकारी एपीआय दरेकर, पीएसआय गेडाम, पीएसआय वडतकर, पीएसआय गव्हारे, पीएसआय राठोड तसेच कर्मचारी संपत बंडी, संपत पुलीवाला, वंदना आडे, रामचंद्र पवार, प्रकाश निमकर, राज नेवारे, संघपाल गेडाम, योगेश पिझकर, संजय रणदिवे यांनी रक्तदान केले. तसेच चुनाळा चे पोलीस पाटील रमेश निमकर यांनीही रक्तदान केले. यावेळी एकूण 58 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी एपीआय संतोष दरेकर, एपीआय प्रशांत साखरे, पीएसआय ओमप्रकाश गेडाम, पीएसआय सदानंद वडतकर, पीएसआय हिराचंद गव्हारे, पीएसआय एकनाथ राठोड, पीएसआय विजय खोब्रागडे, पीएसआय नरेंद्र तुमसरे आदी अधिकारी व कर्मचारी वृंदाने मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here