राऊत परिवाराने केला अनोखा वाढदिवस साजरा

0
617

राऊत परिवाराने केला अनोखा वाढदिवस साजरा

 

 

राजुरा : प्रज्ञा राऊत व अमोल राऊत यांच्या दोन्ही चिमुकल्या तसेच जयाबाई सदाशिव राऊत यांच्या नाती रिंझन व लेखणी (अँझेन) या दोघींचा 10 जून ला वाढदिवस स्वयंवर मंगल कार्यालय येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

 

यावेळी 200 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. या वाढदिवस कार्यक्रमाला प्रामुख्याने शहरातील बरीच मोठी मंडळी व शहरातील जवळपास 800 हुन अधिक नागरिक उपस्थित राहून दोन्ही चिमुकलींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी नेहमी प्रमाणे सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या राउत परिवाराने दिव्यांग मुलींना अन्न धान्य किट वितरण केल्या. दृष्टीहीन जनकल्याण बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित सावित्रीबाई फुले अंध मुलींचे वसतिगृह, गोकुल नगर वॉर्ड बल्लारपूर येथील तेजस्विनी रवींद्र पिपरे (10 वी पास), अश्विनी दिलीप मशाखेत्री, मयुरी विनोद मोंके (BA प्रथम वर्ष), दुर्गा गजानन तुंबलवार, शामका गजानन राठोड, प्रणाली रामकृष्ण उईके, प्रतिक्षा दिवाकर शेरकुरे, काजल किशोर खोब्रागडे (BA द्वितीय वर्ष), पायल विनायक चांदेकर, भाग्यश्री विश्वेश्वराव मेश्राम, मैना विजय तोगरे, प्रणाली दिपक दुर्योधन, स्वातीका नामदेव ठाकरे (BA तृतीय वर्ष), प्रगती सिद्धार्थ रामटेके (MA) या मुलींना अन्नधान्य किट वितरित करण्यात आल्या, हे विशेष…! तसेच स्वामी विवेकानंद अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना भोजन दान करून जन्मदिन साजरा करण्यात आला.

 

आपल्या दोन्ही मुलींच्या जन्मदिनाच्या औचित्य साधत नेहेमी प्रमाणे अमोल राऊत यांनी यावर्षीही अन्नधान्य किट वितरित, दोनशे वृक्ष वागवडीचा संकल्प करत सामाजिक संदेश दिला. यावेळी राहुल अंबादे सह मित्रमंडळी आदींनी मोलाचे सहकार्य केले. सायंकाळी 7 वाजता स्वरूची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या अनोख्या वाढदिवसाचे शहरात चांगलेच कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here