अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी दोन वाहनांवर कार्यवाही

0
443

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी दोन वाहनांवर कार्यवाही

चंद्रपूर, दि. 1 फेब्रुवारी:  जिल्हा भरारी पथकाने राजुरा ते लक्कडकोट रोडवर मौजा लक्कडकोट येथे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणे दोन वाहनांवर जप्तीची कार्यवाही केली. सदर कार्यवाही अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

भोपाल येथील दिलीप बिल्डकॉन लिमिटेड यांच्या मालकीचे हायवा ट्रक क्र. एमएच-23, ए.यु.2493 व एमएच – 23, ए.यु.2610 ही वाहने राजुरा ते लक्कडकोट रोडवर मौजा लक्कडकोट येथे अवैध गिट्टी (दगड) उत्खनन करून वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. सदर दोन्ही वाहनांवर जप्तीची कार्यवाही करून लक्कडकोट येथील पोलीस पाटील, देविदास फकरू कातकर यांच्याकडे सुपूर्दनाम्यावर देण्यात आले. सदर वाहनावर प्रती वाहन 2 लक्ष 77 हजार 500 याप्रमाणे दंड आकारण्यात आला असून एकूण रु. 5 लक्ष 55 हजार दंडाची रक्कम वसुलीची कार्यवाही करण्यात येत आहे. असे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here