गोंडवाना विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 5 ऑक्टोंबर पासून
गोंडवाना विद्यापीठांतर्गत सर्व महाविद्यालयात न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पदवी व पदव्युत्तर विभागाच्या अंतिम वर्षाच्या व अंतिम सत्राच्या परीक्षा ५ ऑक्टोंबर पासून अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकानुसार ऑनलाइन बहु पर्यायी पद्धत नुसार होणार आहे. परीक्षा घरी बसून देता येणार आहे. विद्यार्थ्यांनी ॲप व लिंक द्वारे आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी २५ सप्टेंबर पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. एका वेळी एकच प्रश्न दिसेल त्या प्रश्नाचे उत्तर देता अथवा न देता पुढे जाता येईल. मात्र असा प्रश्न विद्यार्थ्यांना सोडविला असे गृहीत धरण्यात येईल . याचे उत्तर बदलता येणार नाही केलेले प्रश्न किंवा नंतर चे प्रश्न बघता येणार नाही. ही परीक्षा विद्यापीठ चां १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित असेल.ग्रामीण भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा ऑफ़लाइन पद्धतीने देता येईल. मात्र या भागातील ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देण्याची इच्छा असेल असे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देऊ शकतात त्याची यादी संबंधित महाविद्यालयात 25 सप्टेंबर पर्यंत विद्यापीठाकडे सादर करावी लागेल. विद्यार्थ्यांचे परीक्षेला सुरुवात करताच वीजप्रवाह खंडित झाल्यास किंवा नेटवर्क अडथळा निर्माण झाल्यास किंवा इतर तांत्रिक अडचण आल्यास विद्यार्थ्यांना आठ तासात परत ऑनलाईन लॉगिन करता येईल .काही कारणावस्त विद्यार्थी परीक्षेला बसू न शकल्यास त्यांना पुन्हा संधी दिली जाईल. या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी 25 ते 30 सप्टेंबर या कालावधीत मॉक टेस्ट घेण्यात येईल परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना उत्तरसुची पुरविल्या जाणार नाही तसेच पूर्ण मूल्यांकन केले जाणार नाही. असे गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताड़े यांनी कळविले आहे.
